भुसावळ-इगतपुरी मेमू ट्रेन नाशिक स्टेशनपर्यंतच धावणार!

140

भुसावळ ते इगतपुरी मेमूने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी ही बातमी महत्त्वाची आहे. भुसावळ ते इगतपुरी असा प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांसाठी सोयीची असणारी मेमू पुढील आठवड्यात चार दिवस इगतपुरीला न जाता केवळ नाशिक रोड स्टेशनपर्यंतच धावणार आहे. यामुळे चाकरमान्यांची चांगलीच धावपळ होणार आहे.

भुसावळ – देवळाली शटल सेवा कोरोना महामारीमुळे बंद करण्यात आली होती. या मार्गावरील अनेक लहान गावांना जोडणारी गाडी दररोज हजारो प्रवाशांसाठी सोयीस्कर ठरत होती मात्र यावर पर्याय म्हणून जानेवारीपासून भुसावळ ते इगतपुरी दरम्यान मेमू ट्रेन सुरु करण्यात आल्याची माहिती मिळतेय. त्यामुळे पुन्हा एकदा चाकरमान्यांची सोय झाली. पण आता पुन्हा ही मेमू काही दिवसांसाठी बंद ठेवण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे.

(हेही वाचा – दौरा रद्द झाल्यानंतरही बृजभूषण सिंह यांचे राज ठाकरेंना आव्हान)

या मार्गावरील चाकरमान्यांच्या मागणीनुसार भुसावळ रेल्वे प्रशासनाने ही मेमू ट्रेन सुरू केली होती. इगतपुरी रेल्वे यार्डात रेल्वे प्रशासनातर्फे 28 मे ते 01 जून या दरम्यान तांत्रिक काम हाती घेण्यात येणार असल्याने ही गाडी नाशिकपर्यंतच धावणार असल्याचे रेल्वे प्रशासनातर्फे कळविण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळ ते इगतपुरी स्टेशन दरम्यान धावणारी मेमू गाडी पुढील आठवड्यात 04 दिवस इगतपुरी न जाता, नाशिक स्टेशनपर्यंतच धावणार आहे. इगतपुरी रेल्वे यार्डात रेल्वे प्रशासनातर्फे पाच दिवस बंद ठेवण्यात येणार आहे. या मार्गावर दुरुस्तीचे काम आल्याने हा निर्णय घेण्यात आला असल्याचे प्रशासनाकडून सांगितले जात आहे. मात्र या चार दिवसात प्रवाशांची गैरसोय होणार असून त्यांना त्याचा सामना करावा लागणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.