किरकोळ बाजारात टोमॅटो ‘शंभरी’ पार

128

वाढत्या महागाईच्या झळा सर्वसामान्यांना बसत आहेत. देशभरात टोमॅटोचे उत्पादन घटल्यामुळे बाजारभाव वाढू लागले आहेत. मुंबई बाजार समितीमध्ये टोमॅटोचे दर 40 ते 80 रुपयांवर पोहोचले असून, किरकोळ मार्केटमध्येही भाव 90 ते 100 रुपये झाले आहेत.

वर्षभर टोमॅटोला मोठी मागणी

दक्षिणेतील राज्यांनाही महाराष्ट्रातून टोमॅटो पुरवला जात आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबईमध्ये नियमितपणे सर्वाधिक मागणी असलेल्या भाज्यांमध्ये टोमॅटोचाही समावेश होतो. मुंबईकरांच्या आवडीची पावभाजी, सॅलॅड व सर्वसामान्य नागरिकांच्या आहारातही टोमॅटोची भाजी नियमित केली जाते. त्यामुळे वर्षभर टोमॅटोची मोठ्या प्रमाणात मागणी असते.

( हेही वाचा: मुख्यमंत्री म्हणतील म्हणून, नळातून येणा-या हवेला पाणी समजा! फडणवीसांचा हल्लाबोल )

टोमॅटोच्या दरांत अधिक वाढ होण्याची शक्यता

मुंबई बाजार समितीमध्ये एक महिन्यापूर्वी 14 ते 22 रुपये किलो दराने टोमॅटो विकला जात होता. एक आठवड्यापूर्वी हे दर 25 ते 60 रुपये किलो झाले व सोमवारी बाजारभाव 40 ते 80 रुपयांवर गेले आहेत. किरकोळ बाजारात 90 ते 100 रुपये दराने टोमॅटोची विक्री होत असून, त्यामध्ये अजून वाढ होण्याची शक्यता आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.