मागच्या काही दिवसांपासून ज्ञानवापीवरुन वातावरण तापले आहे. हे ज्ञानवापी प्रकरण सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचले. आता याच पार्श्वभूमावर ज्ञानवापीचं हे लोण गोव्यातही पोहोचले आहे. गोवा सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. गोव्यातील उद्धवस्त मंदिरांची बांधणी केली जाणार असल्याची घोषणा गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केली आहे. पोर्तुगीजांच्या काळात उद्ध्वस्त झालेल्या मंदिरांच्या पुनर्बांधणीसाठी गोवा सरकारकडून अर्थसंकल्पात निधीची तरतूद करण्यात आली आहे.
( हेही वाचा: IND Vs SA: संघ निवडीवर प्रश्न उपस्थित;शिखर धवनला फोन करत राहुल द्रवीड म्हणाले….)
अर्थसंकल्पात विशेष तरतूद
गोवा सरकारने मागच्या काही महिन्यांपासून एक विभागीय सर्व्हे सुरु केला होता आणि या सर्व्हेमधून जी माहिती हाती लागली आहे, त्यावरुन गोवा सरकार आता पुढचा निर्णय घेत आहे. ज्या ठिकाणी पोर्तुगीज काळात हिंदू मंदिरे होती, त्या मंदिरांना उद्ध्वस्त करण्यात आले. त्याठिकाणी दुस-या धर्माची धार्मिक स्थळे उभारण्यात आली. त्याचा सर्व्हे करुन संपूर्ण माहिती गोवा सरकारने घेतली आहे आणि आता त्याच ठिकाणी उद्ध्वस्त मंदिरांची पुनर्बांधणी केली जाणार आहे. तसेच, या मंदिरांच्या पुनर्बांधणीसाठी विशेष निधीची तरतूदही करण्यात आली आहे.
गोवा सरकारने घेतलेल्या या निर्णयानंतर, आता येणा-या काळात धार्मिक स्थळांवरुन वातावरण अधिक तापण्याची शक्यता आहे.
Join Our WhatsApp Community