पुण्यातील एक संशयित महाराष्ट्र एटीएसच्या ताब्यात आहे. दहशतवादी कारवायांसाठी निधी जमा केल्याचा आरोप या संशयित व्यक्तीवर आहे. एटीएसच्या ताब्यातील संशयित हा काश्मिरमध्ये जाऊन आल्याची माहितीसुद्धा समोर आली आहे. हा संशयित व्यक्ती लष्कर- ए -तोयबा साठी काम करत असल्याचा, संशय व्यक्त केला जात आहे.
काश्मिरमधील अतिरेकी संघटनांशी संबंध
मागच्या काही दिवसांपासून एटीएस पथक हे या संदर्भात शोध घेत होते, पुण्यातील दापोडी परिसरातून या संशयित व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याला काही वेळातच पुण्यातील न्यायालयात हजर केले जाणार आहे. जुनेद मोहम्मद असे ताब्यात घेण्यात आलेल्या तरुणाचे नाव असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. काश्मिरमधील अतिरेकी संघटनांकडून या संशयित व्यक्तीला पैसे देण्यात आले आहेत. इतर ठिकाणाहूनही या व्यक्तीला फंडींग मिळाल्याची माहिती आहे.
( हेही वाचा :डेबिट-क्रेडिट कार्डचे नियम बदलणार; जाणून घ्या नवे नियम )
अधिक तपास सुरु
सध्या या व्यक्तीचा या दहशतवादी संघटनांशी काय संबंध आहे. तो त्यांच्यासाठी काय काम करत होता. यासंदर्भातील तपास सुरु आहे. या संशयित व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले आहे. थोड्या वेळातच त्याला पुण्यातील शिवाजी नगर न्यायालयात हजर केले जाणार आहे.
Join Our WhatsApp Community