राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर अपमानास्पद भाषेतील पोस्ट व्हायरल केल्याप्रकरणी सध्या अभिनेत्री केतकी चितळे ही पोलिसांच्या ताब्यात आहे. पवारांविरोधात टाकलेली पोस्ट सोशल मीडियावरून हटवण्यास केतकीने पोलिसांना नकार दिला आहे. ती आक्षेपार्ह पोस्ट आपल्या मर्जीने आपण ती टाकल्याच्या निर्णयावर ती अद्यापही ठाम आहे. मात्र पोस्टमुळे अद्यापही वाद सुरू असताना सायबर सेलकडून ती पोस्ट हटवली जात नसल्याने चर्चा होताना दिसताय.
(हेही वाचा – केतकीला झालेला ‘एपिलेप्सी’ आजार नेमका आहे तरी काय?)
शरद पवार यांच्यावर वादग्रस्त शब्दात पोस्ट करणारी केतकी चितळेला अटक केली आहे. तिच्या या पोस्टमुळे राज्यात राजकीय वर्तुळात एकच वाद-विवाद सुरू आहे. यामुळे ती पोस्ट हटविण्यासाठी पोलिसांनी केतकीला सूचना केल्या आहेत. मात्र तिने ही पोस्ट हटविण्यास नकार देऊन आपल्या मर्जीने ती पोस्ट टाकल्याचे सांगितले आहे. अशातच सायबर सेलने देखील ती पोस्ट हटविलेली नाही. त्यामुळे या पोस्टवर अद्याप नवे वाद निर्माण होतील अशा प्रतिक्रिया येत आहेत. असे असतानाही सायबर सेलने अद्याप ही पोस्ट न हटविण्यामागचे नेमके कारण काय, असाही प्रश्न उपस्थित केला आहे. त्यामुळे राज्याच्या सायबर सेलचे या प्रकरणात दुर्लक्ष होतेय का, असाही सवाल विचारला जात आहे.
२०२० मध्ये केतकीवर जातिवाचक पोस्ट केल्याप्रकरणी ठाण्यातील रबाळे पोलीस ठाण्यात अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. या गुन्हात मागील तीन दिवसांपासून चौकशीसाठी ती नवी मुंबई पोलिसांच्या कोठडीत आहे.
Join Our WhatsApp Community