अंडरवर्ल्ड डॉन दाऊद कराचीमध्येच, ईडीच्या तपासात भाच्याचा खुलासा

187

संयुक्त राष्ट्रद्वारे घोषित दहशतवादी आणि अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम पाकिस्तानातील कराची मध्ये असल्याचा दावा त्याचा भाचा अली शाहाने केला आहे. दाऊदच्या ठिकाण्यासंदर्भात हसीना पारकरच्या मुलाला प्रश्न विचारण्यात आले. त्यावेळी त्याने ही माहिती ईडीला दिली.

काय केला खुलासा

दाऊद इब्राहिमचा भाचा अलीशाह पारकरने खुलासा केला आहे की, भारताचा मोस्ट वॉन्टेड कुख्यात पाकिस्तानच्या कराचीमध्ये आहे आणि त्याचे कुटुंब सणासुदीच्या वेळी दाऊदच्या पत्नीच्या संपर्कात असते. अंडरवर्ल्ड डॉनचा भाचा अलीशाह पारकरने अंमलबजावणी संचालनालय, ईडीला दिलेल्या निवेदनात दाऊद पाकिस्तानातील कराची येथे आहे आणि तो जन्माला येण्यापूर्वीच 1986 नंतर भारत सोडून गेला होता, असा खुलासा केला आहे.

(हेही वाचा – ‘ती’ वादग्रस्त पोस्ट हटवण्यास केतकीचा नकार, राज्याच्या सायबर सेलचे दुर्लक्ष?)

अलीशाह पारकर यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, “दाऊद इब्राहिम हा माझा मामा आहे आणि तो 1986 पर्यंत डंबरवाला भवनच्या चौथ्या मजल्यावर राहत होता. दाऊद इब्राहिम पाकिस्तानातील कराची येथे असल्याचे मी विविध स्त्रोतांकडून आणि नातेवाईकांकडून ऐकले आहे. मला सांगायचे आहे की, दाऊद इब्राहिम हा माझा मामा कराची, पाकिस्तान येथे आहे. अलीशाह म्हणाला, “तो भारत सोडून गेला तेव्हा माझा जन्मही झाला नव्हता आणि मी किंवा माझ्या कुटुंबातील सदस्य त्याच्या संपर्कात नाही. मला हेही नमूद करावे लागेल की, कधी कधी ईद, दिवाळी आणि इतर सणांच्या निमित्ताने माझा मामा दाऊद इब्राहिमची पत्नी, महजबीन दाऊद इब्राहिम माझी पत्नी आयशा आणि माझ्या बहिणींच्या संपर्कात आहे.

अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) अलीशाह पारकरची अनेकदा चौकशी केली. याआधी फेब्रुवारीमध्ये दाऊद इब्राहिमच्या भाच्याची मुंबईतील एका राजकारण्याशी संबंध असलेल्या मनी लाँड्रिंग प्रकरणात चौकशी करण्यात आली होती.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.