लोणावळ्यात बेपत्ता झालेल्या दिल्लीच्या ‘त्या’ तरुणाचा आढळला मृतदेह

148

लोणावळ्यामध्ये ड्यूक नोज या पॉईंटला ट्रेकिंगला गेलेला दिल्लीस्थित इंजिनिअर तरूण पर्यटक शुक्रवारी 20 मेच्या दुपारपासून जंगलात बेपत्ता झाला होता. बेपत्ता झालेल्या तरुणाचे नाव फरहान शाह (वय -24) आहे. इरफान हा अभियंता असून दिल्ली येथे वास्तव्यास आहे. त्याने आपल्या भावाला फोन करून जंगलात ट्रेनच्या रुळावरून उतरल्याची माहिती दिली होती. त्यानंतर काही तासांनी त्याचा फोन बंद झाला. त्याच्या कुटुंबीयांनी तातडीने तो हरवल्याची तक्रार दाखल केली होती. परंतु, आज मंगळवारी त्याचा मृतदेह आढळल्याची माहिती मिळत आहे.

(हेही वाचा – धक्कादायक! मालवणजवळील तारकर्लीत २० पर्यटक असलेली बोट बुडाली)

फरहान शहा कामानिमित्त कोल्हापूरला आला होता यावेळी दिल्लीला परतण्यापूर्वी त्याने लोणावळा-खंडाळ्याचा फेरफटका मारायचे ठरवले होते. त्याप्रमाणे तो जंगलसफारीला गेला असता मंगळवारी त्याचा मृतदेह सापडला असल्याची माहिती मिळत आहे. जंगलात फिरत असताना जंगलात तो वाट चुकला. 20 मे रोजी दुपारी अडीचच्या सुमारास त्याचा घरच्यांशी शेवटचा संपर्क झाला. त्यानंतर या प्रकरणी पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला होता आणि तीन दिवसांनी त्याचा मृतदेह आढळला.

New Project 2 19

लोणावळा ग्रामीण पोलीस, मावळ वन्यजीव संरक्षक आणि लोणावळा शिवदुर्ग ग्रुपचे स्थानिक स्वयंसेवक या युवकाचा दाट जंगलात शोध घेत होते. ड्यूक पॉइंटच्या परिसरात त्याचा शोध घेण्यासाठी समर्पित पथके तयार करण्यात आली होती. तर ड्रोनच्या सहाय्याने परिसर स्कॅन करून त्याचा शोध सुरू होता. तर दुसरीकडे शहा परिवाराने जो कोणी बेपत्ता फरहानला शोधून काढेल त्याला एक लाखाचे बक्षीस मिळणार असे पत्रक प्रसिद्धीसाठी देखील जारी केले होते. मात्र आज ही दुर्दैवी माहिती समोर आली आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.