मान्सून कालावधीत विशेषत: जून व जुलै या महिन्यात वीज पडण्याचे प्रमाण लक्षात घेता जीवितहानी टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून पृथ्वी मंत्रालय भारत सरकार नवी दिल्ली यांनी दामिनी अॅप तयार केले आहे. हे अॅप वीज पडण्याची पूर्व सूचना देणार आहे. त्यामुळे नागरिकांनी वीज पडून होणाऱ्या धोक्यापासून वाचण्यासाठी दामिनी अॅप वापरावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
( हेही वाचा : सरकारी कर्मचाऱ्यांना बायोमेट्रिक हजेरी पुन्हा अनिवार्य!)
दामिनी अॅप
सुरक्षात्मक उपाययोजना म्हणून सर्व शासकीय यंत्रणेतील अधिकारी, कर्मचारी, क्षेत्रीय अधिकारी, मंडळ अधिकारी, अव्वल कारकून, महसूल सहाय्यक, सरपंच, पोलीस पाटील, तलाठी, कृषिसेवक, कोतवाल, आशा कार्यकर्त्या, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेवक, ग्रामपंचायत संगणक परिचालक आणि नागरिकांनी या अॅपचा वापर करावा.
दामिनी अॅप गुगल प्लेस्टोअरवर खाली दिलेल्या लिंकवरुन डाऊनलोड करता येईल. या ॲपमध्ये जीपीएसद्वारे अलर्ट नुसार आवश्यक पूर्वसूचना गावातील नागरिकांना देण्यात येतील. तसेच या अॅपचा वापर करून जीवितहानी टाळावी असे आवाहन आपत्ती व्यवस्थापनाने केले आहे.
दामिनी अॅप लिंक :- https://play.google.com/store/apps/details?id=com.lightening.live.damini&hl=en_IN&gl=US
Join Our WhatsApp Community