ज्ञानवापी मशिदीसंदर्भात मंगळवारी वाराणसीच्या जिल्हा न्यायालयात सुनावणी झाली. दोन्ही बाजुंचा युक्तीवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने याप्रकरणी पुढील सुनावणी 26 मे रोजी ठेवली आहे.
सुनावणीनंतर हिंदू पक्षाचे वकील विष्णू जैन म्हणाले की, मुस्लिम पक्षाच्या बाजुच्या आदेशाच्या याचिकेवर 7-11 सीपीसी अंतर्गत याचिकांवर 26 मे रोजी सुनावणी होणार आहे. न्यायालयाने दोन्ही पक्षांना आयोगाच्या अहवालावर आक्षेप नोंदवून आठवडाभरात अहवाल सादर करण्यास सांगितले आहे.
(हेही वाचा – SIM कार्डशी संबंधित महत्त्वाचा ‘हा’ नियम केंद्र सरकारने बदलला!)
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ज्ञानवापी मशीद वादाची सुनावणी वाराणसी जिल्हा न्यायालया समोर सुरू झाली. सुनावणी दरम्यान याचिकाकर्त्या हिंदू पक्षाने सर्वेक्षणात समोर आलेले साक्षी पुरावे न्यायालयाने पाहावेत, त्यानंतर त्यापुढील सुनावणी करावी अशी मागणी केली. तर, मुस्लिम पक्षाने खटल्याच्या वैधतेवर सुनावणीची मागणी केली होती. दरम्यान, न्यायालयीन सुनावणी सुरू होण्यापूर्वी न्यायालयाच्या बाहेर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. सुनावणीच्या वेळी पक्षकार आणि वकिलांनाच प्रवेश देण्यात आला होता. सर्वेक्षणासाठी यापूर्वी नियुक्त केलेले न्यायालयाचे आयुक्त अजय मिश्रा यांचेही नाव यादीत नसताना त्यांना परत पाठण्यात आले.
Join Our WhatsApp Community