सिडको या नवी मुंबईतील सरकारी कंपनीने आपल्या ताब्यातील 279.26 हेक्टर जागा वनविभागाच्या कांदळवन कक्षाला हस्तांतरित केली. तिसऱ्या टप्प्यात पनवेल आणि उरणमधील जागा ताब्यात आल्यानंतर आता कांदळवन कक्षाला वसई विरार पालिकेच्या ताब्यातील 1 हजार 450 हेक्टर जागा मिळवण्याचा मानस आहे.
( हेही वाचा : कांदळवनावर डेब्रिज टाकून रस्ता)
वसई विरार पालिकेच्या ताब्यातील जागा मिळवण्याचा मानस
सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय मुखर्जी आणि कांदळवन कक्षाचे अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक विरेंद्र तिवारी यांच्या उपस्थितीत मंगळवारी जमीन हस्तांतरणाचा कार्यक्रम पार पडला. या अगोदर सिडकोने 281 हेक्टरची जागा पहिल्या टप्प्यात हस्तांतरीत केली. दुसऱ्या टप्प्यात 68 हेक्टर जागा कांदळवन कक्षाच्या ताब्यात आली. तिसऱ्या टप्प्यात पनवेलमधील 233.12 हेक्टर आणि 45.14 हेक्टर जागा उरणमधील जागा हस्तांतरीत झाली. पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी सिडको प्रशासनाशी बैठक घेतल्यानंतर जमीन हस्तांतराच्या कामाला वेग आला, यासाठी वनाधिकाऱ्यांनी पर्यावरणमंत्र्यांना धन्यवाद दिले.
Join Our WhatsApp Community