मुंबई शहराला मंगळवारी सकाळी सरप्राईज देणा-या पावसाच्या हलक्या सरी बुधवारी आणि गुरुवारीही पुन्हा बरसतील, असा अंदाज मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने वर्तवला आहे. मात्र पावसाच्या हलक्या सरी कोसळत असल्या तरी दिवसभराच्या उकाड्यापासून मुंबईकरांची सुटका होणार नाही.
( हेही वाचा : हेरिटेज कमिटीच्या परवानगीशिवाय २५० बांधकामे तोडण्यास आयुक्तांची मुभा, शेलार म्हणतात विकासकांना ७० हजार कोटींचा फायदा मिळवण्याचा प्रयत्न)
मुंबईत दोन दिवस हलक्या पावसाची शक्यता
मंगळवारी किमान २९.२ तर कमाल ३४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मुंबईत शहरात आर्द्रतेचे प्रमाण ८७ टक्के तर उपनगरात ७१ टक्क्यांवर नोंदवले गेले. किमान तापमान २९. २ अंश सेल्सिअस नोंदीसह मे महिन्यातील सर्वात जास्त कमाल तापमानाच्या नोंदीतील नवा रेकॉर्डवर पोहोचले. कुलाब्यात केवळ ३.८ मिमी पावसाची नोंद झाली. उपनगर भागांत तुरळक प्रमाणात पाऊस झाला. उद्या कमाल तापमान ३४ तर किमान तापमान २९ अंश सेल्सिअसवर राहील, असा अंदाज मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने वर्तवला.
Join Our WhatsApp Community