अंबरनाथमधील एमआयडीसी परिसरात असणाऱ्या रितिका नावाच्या केमिकल कंपनीत भीषण आग लागली. ही घटना बुधवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास घडली. या लागलेल्या भीषण आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम अग्निशमन दलाच्या टीमकडून सुरू असल्याचे सांगितले जात आहे.
अग्निशमन दलाच्या ३ ते ४ गाड्या दाखल
मिळालेल्या माहितीनुसार, रितिका नावाच्या केमिकल कंपनीत असलेल्या एका विशिष्ट सॉल्व्हंट केमिकलच्या ड्रमला ही आग लागल्याने संपूर्ण कंपनीत त्याचा भडका उडाला. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या ३ ते ४ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून या ठिकाणी लागलेल्या भीषण आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
(हेही वाचा – केंद्राचा मोठा निर्णय, गव्हानंतर आता साखरेच्या निर्यातीवर बंदी)
तसेच या आगीत कंपनीचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जिवीतहानी झालेली नाही.