शिवसेनेने संभाजी राजे छत्रपतींना उमेदवारी नाकारल्यानंतर, आता यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया आली आहे. फडणवीस यांनी छत्रपती संभाजी राजेंची कोंडी केली जात असल्याचा, आरोप मविआ सरकारवर केला. पण त्यांनी यावेळी भाजपची भूमिका स्पष्ट केली नाही. देवेंद्र फडणवीस हे नागपुरात मीडियाशी संवाद साधत होते.
हे लोक महागाईवर बोलू कसे शकतात?
देवेंद्र फडणवीस यांनी इंधन दरवाढीच्या मुद्द्यावरुन राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना सवाल केला. पेट्रोल, डिझेलवर राज्याचा कर 29 रुपये आणि केंद्राचा कर 19 रुपये आहे. राज्याचा कर का कमी करत नाही? आधी शरद पवार यांनी यावर बोलावे, असे सागंतानाच महागाई वाढवण्याचे काम महाराष्ट्र सरकार करत आहे. 29 रुपये कर पेट्रोल, डिझेलवर लावून हे लोक महागाईवर बोलू कसे शकतात? याचे मला आश्चर्य वाटते आहे, असे फडणवीस म्हणाले.
( हेही वाचा :“विकासाच्या नावाखाली जनेतेची फसवणूक करणं पवारांची जुनी परंपरा” )
बैठकीत चर्चा केली जाणार
छत्रपती संभाजी बुधवारी मराठा संघटनांशी चर्चा करणार आहेत. या बैठकीत निवडणुकीच्या गणितावर चर्चा केली जाईल. भाजपने अजूनही संभाजीराजेंना पाठिंबा दिला नाही. त्यावरही चर्चा केली जाणार आहे.
Join Our WhatsApp Community