मुंबईला परतणाऱ्या कोकणवासियांसाठी खुशखबर! परशुराम घाट खुला

153

चौपरीकरणाच्या कामासाठी २५ एप्रिल २०२२ ते २५ मे २०२२ यादरम्यान मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाट वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला होता. यावेळी परशुराम घाट महामार्गावरील सर्व प्रकारची वाहतूक पूर्णत: बंद ठेवण्यात आली होती. चौपदरीकरणाच्या कामामध्ये अडथळा निर्माण होऊ नये व कामाला गती मिळावी आणि पावसाळ्यापूर्वी धोकादायक क्षेत्रातील काम पूर्ण व्हावे यासाठी घाट बंद ठेवण्याचा निर्णय जिल्हाधिकारी यांनी घेतला होता. त्यामुळे काही प्रमाणात कोकणवासियांसह चाकरमान्यांना त्रासाला सामोरे जावे लागले होते. मात्र आता मुंबईला परतणाऱ्या कोकणवासियांसाठी एक खुशखबर आहे.

(हेही वाचा – छत्रपतींच्या वंशजांच्या पाठीत खंजीर खुपसायचा प्रयत्न, संभाजीराजेंसाठी मनसेचा शिवसेनेवर हल्ला)

अवघे ६५ टक्के काम पूर्ण

ही खुशखबर म्हणजे मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटातील वाहतूक उद्यापासून म्हणजेच २६ मेपासून नियमित सुरु होणार असल्याचे सांगितले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, २५ एप्रिल ते २५ मे या महिनाभरात ठराविक वेळेत घाटातील वाहतूक सहा तास बंद ठेवून रस्त्याच्या रुंदीकरणाचे अवघे ६५ टक्के काम पूर्ण झाले आहे. २५ एप्रिल ते २५ मे यादरम्यान दररोज दुपारी १२ ते संध्याकाळी ६ या कालावधीत घाट बंद होता. मात्र घाट बंदची मुदत आज संपुष्टात येत आहे. दरम्यान, कंत्राटदार कंपन्यांची मुदतवाढीची मागणी महामार्ग विभागाने नाकरली आहे.

घाटातील वाहतूक सहा तासांसाठी होती बंद

काही दिवसांपूर्वी मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाला सुरुवात झाली होती. या कामाला गती देऊन पावसाळ्यापूर्वी रुंदीकरण पूर्ण करणे तसेच आवश्यक तिथे संरक्षण भिंत उभारणे यासाठी घाटातील वाहतूक सहा तास बंद ठेवण्यात आली होती. वाहतूक बंदी असलेल्या काळात केवळ कमी वजनाची वाहतूक ही आमडस-चिरणी-लोटे रस्ता कळंबस्ते-आमडस-धामणंद रस्ता मार्गे पर्यायी मार्गाने वळवण्यात आलेली होती.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.