ओबीसी आरक्षणासाठी पवारांची केंद्र सरकारकडे मागणी, म्हणाले…

138

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. यावरुनच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी थेट मोदी सरकारकडे मागणी केली आहे. केंद्र सरकारने जातीनिहाय जनगणना करण्याची मागणी शरद पवार यांनी केली आहे.

मग उत्तरं मिळतील

राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे राज्यस्तरीय ओबीसी अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे. देशातील ओबीसींच्या संख्येबाबत अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. त्यामुळे केंद्र सरकारने ओबीसींची जातीनिहाय जनगणना करण्याचा ठराव या परिषदेत सर्वानुमते मान्य करण्यात आला आहे. यामुळे ओबीसींच्या संख्येबाबत जे काही प्रश्न उपस्थित होत आहेत त्यांची उत्तरं मिळतील, असे शरद पवार यांनी म्हटले आहे.

(हेही वाचाः हॉटेल-रेस्टॉरंट्समध्ये सेवा शुल्काच्या नावाखाली लूट, केंद्र सरकारचा कारवाईचा इशारा)

इथे कोणीही काहीही फुकट मागायला येत नाही. जो अधिकार न्याय्य आहे तो प्रत्येकाला मिळाला पाहिजे. त्यामुळे जातीय जनगणना करण्याशिवाय गत्यंतर नसल्याचे पवारांनी म्हटले आहे.

केंद्र सरकारवर टीका

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पुन्हा एकदा ओबीसी जनगणनेचा प्रश्न उपस्थित केला आहे. त्यांनीही जातीनिहाय जनगणनेची मागणी केली आहे. पण आज ज्यांच्या हातात देशाची सूत्रं आहेत, त्यांच्याकडून हा निर्णय होईल, असं वाटत नाही. यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र येऊन रस्त्यावर यायला हवं. त्याशिवाय पर्याय नसल्याचे सांगत पवारांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.

(हेही वाचाः राज्यसभेसाठी शिवसेनेचे ठरलेच, ‘संजय आणि संजयच’)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.