अ‍ॅक्युपंक्चर थेरपिस्टची व्यथा; व्यवसायाला समाजात मान नसल्याने मोडला संसार

186

मुंबईत महाराष्ट्र अ‍ॅक्युपंक्चर काऊन्सिलच्यावतीने नोंदणी परिषदेत आयोजित करण्यात आलेली आहे. यात बाहेरून आलेल्या एका थेरपिस्टची चर्चा होत आहे. आता वयाची पन्नाशी ओलांडलेल्या या अ‍ॅक्युपंक्चर थेरपिस्टने रुग्णसेवेसाठी निवडलेल्या करिअरचा पर्याय त्यांच्या खासगी आयुष्यात मात्र मोठी अडचण ठरला. तारुण्यात हवीतशी जोडीदार मिळाली खरी, मात्र निवडलेला व्यवसाय संसारासाठी अडचण ठरला. सासऱ्यांनी जावई अ‍ॅक्युपंक्चर थेरपिस्ट असल्याचे समजताच मुलीला माहेरी परत बोलावले. तेव्हापासून पती-पत्नी वेगळे रहात आहेत.

कायदेशीर ओळख मिळाली तर सन्मानपूर्वक वागणूक मिळेल

आता सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मला कायदेशीररित्या अ‍ॅक्युपंक्चरची पदवी मिळेल. समाजात सन्मान मिळेल. त्याच सन्मानाने मी बायकोला घरी आणेन, पत्नीच्या विरहाने व्याकुळ झालेल्या त्या अ‍ॅक्युपंक्चर थेरपिस्टची समाधानाने मुंबई सोडली. या कहाणीची परिषदेत चर्चा झाली. राज्यात कित्येक अ‍ॅक्युपंक्चर थेरपिस्टला अद्याप समाजात अपेक्षित सन्मान मिळत नाही. या पेशाला अधिकृत मान्यता मिळण्यासाठी धडपडणाऱ्या महाराष्ट्र अ‍ॅक्युपंक्चर काऊन्सिलसमोर अनेक हृदयद्रावक कहाण्या येत आहेत. राज्यातील सर्व नोंदणीकृत अ‍ॅक्युपंक्चर थेरपिस्टला एकदा कायदेशीर ओळख मिळाली की असे कित्येकांचे संसार मार्गी लागतील, कित्येकांना सन्मानपूर्वक पाहिले जाईल, अशी आशा परिषदेतील अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

पैशांसांठी घासाघीस

या व्यवसायात अनेक वर्ष रुग्णसेवा देणाऱ्या अ‍ॅक्युपंक्चर थेरपिस्टला रुग्णांकडून कित्येकदा उपचाराचा योग्य मोबदला दिला जात नाही. रुग्णांनी ठराविक काळ थेअरपी घेणे आवश्यक असते, मात्र त्यांना रुग्ण दर कमी करायला लावतात, हे दुःखही परिषदेच्या माध्यमातून कित्येकांनी व्यक्त केले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.