दहशतवादी संघटनांना आर्थिक मदत केल्याप्रकरणी यासिन मलिक याला दिल्लीच्या पटियाला हाऊस न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. यासिन मलिकला फाशीची शिक्षा सुनावण्यात यावी, अशी मागणी एनआयएकडून करण्यात आली होती. पण त्याला अखेर जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
देशविरोधी कारवायांमध्ये दोषी
टेरर फंडिंग प्रकरणात यासिन मलिकला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तसेच त्याला 10 लाखांच्या दंडाची शिक्षा देखील ठोठावण्यात आली आहे. यासिन मलिक हा जम्मू काश्मिरमधील फुटीरतावादी नेता म्हणून ओळखला जातो. आपण दहशतवादी संघटनांना आर्थिक मदत केल्याची कबुली न्यायालयाने याआधीच न्यायालयाला दिली होती. वयाच्या 17व्या वर्षापासून यासिन मलिकचे दहशतवाद्यांशी संबंध होते. देशविरोधी कारवायांबाबतची अनेक कलमं त्याच्या विरोधात लावण्यात आली होती.
कोण आहे यासिन मलिक?
- देशविरोधी कारवाया केल्याचा यासिन मलिकवर आरोप
- दहशतवाद्यांना आर्थिक मदत केल्याप्रकरणी यासिन मलिक दोषी
- जम्मू-काश्मिरमधील फुटीरतावादी नेता
- जम्मू-काश्मिर लिबरेशन फ्रंटचा प्रमुख
- ही संघटना बेकायदेशीर क्रियाकलाप प्रतिबंध कायदा (UAPA)अंतर्गत दहशतवादी संघटना आहे
- त्याने 1983 साली टाला पार्टीची स्थापना करुन, त्यानंतर इस्लामिक स्टुडंट लीगच्या माध्यमातून काम केले होते
- मुफ्ती सईदच्या मुलीच्या अपहरणाचा आरोप
- काश्मिरी तरुणांना भडकवल्याचा त्याच्यावर आरोप आहे