महापालिका शाळांमधील मुलांच्याही हाती बायजूसचे लर्निंग अ‍ॅप

179

मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण खात्याच्या अखत्यारितील विविध शाळांमध्ये ज्ञानाचे धडे गिरविणा-या विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षण मिळावे, यासाठी आता आणखी एक पाऊल उचलण्यात आले आहे. महापालिकेच्या विद्यार्थ्यांना आता बायजूस संस्थेचे ‘लर्निंग अ‍ॅप’ व इतर सेवा प्रणाली या विनामूल्य वापरासाठी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.

शिक्षण विभागासोबत सामंजस्य करार

आंतरराष्ट्रीय स्तरावर शैक्षणिक कार्य करणारी बायजूस संस्था व मुंबई महापालिकेचा शिक्षण विभाग यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. दावोस (स्वित्झर्लंड) येथे आयोजित जागतिक आर्थिक परिषदेत (वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम) हा करार करण्यात आला आहे. या सामंजस्य करारप्रसंगी महाराष्ट्र राज्याचे पर्यटन व पर्यावरण मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे, उद्योग आणि खनिकर्म खात्याचे मंत्री सुभाष देसाई, अतिरिक्त मुख्य सचिव आशिष सिंह आणि बायजूस संस्थेचे बायजू रविंद्रन हे दावोस मध्ये प्रत्यक्ष उपस्थित होते. तर मुंबई महापालिकेचे आयुक्त डॉ.इक्बाल सिंह चहल‌, सह आयुक्त (शिक्षण) अजित कुंभार हे दूरदृश्य प्रणालीद्वारे या कार्यक्रमात सहभागी झाले होते.

(हेही वाचाः भांडुप, पवई आणि विक्रोळीच्या डोंगराळ भागातील जनतेला धोक्याचा इशारा)

महापालिकेचे पुढचे पाऊल

बायजूस या संस्थेसोबतच्या सामंजस्य करारामुळे महापालिकेच्या विद्यार्थ्यांना बायजूस संस्थेचे ‘लर्निंग अ‍ॅप’ व इतर सेवा प्रणाली या विनामूल्य वापरासाठी उपलब्ध होणार आहेत. तर महापालिकेच्या शाळांमध्ये ज्ञानदानाचे कार्य अविरतपणे करणा-या शिक्षकांना देखील बायजूस संस्थेद्वारे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या निमित्ताने आणखी एक पुढचे पाऊल उचलण्यात आले आहे. यामुळे आता विद्यार्थ्यांना टॅब, मोबाईल, संगणकाच्या माध्यमातून दर्जेदार शिक्षण सहज आणि सोप्या पद्धतीने उपलब्ध होणार आहे. महापालिकेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी मोफत व दर्जेदार शिक्षण मिळण्यासाठी व्हर्च्युअल क्लासरूम, डिजीटल क्लासरूम, टॅब, कम्प्युटर लॅब, सायन्स लॅब, ऍस्ट्रॉनॉमी लॅब, संगीत-कला-क्रीडा अशा विविध उपक्रमाद्वारे अध्ययन व अध्यापन करण्यात येत आहे.

(हेही वाचाः अपघातानंतर तारकर्लीतील पर्यटनाला ब्रेक, मेरिटाईम बोर्डाचा मोठा निर्णय)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.