परिवहन मंत्री अनिल परब यांच्याशी संबंधित एकूण 7 ठिकाणी ईडीची धाड

142

राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या अजिंक्यतारा  या  शासकीय निवासस्थानी ईडीची छापेमारी सुरु असल्याची मोठी बातमी समोर आली आहे. गुरुवारी सकाळी 6:30 च्या सुमारास ईडीचे पथक पोहोचले. ईडीच्या पथकाने संपूर्ण परिसर ताब्यात घेऊन चौकशी सुरु केल्याचे वृत्त आहे. दिवसभर हे धाडसत्र सुरु राहण्याची माहितीदेखील समोर येत आहे. अनिल परब यांच्याशी संबंधित एकूण 7 ठिकाणी ईडीची छापेमारी सुरु आहे. अनिल परब यांचे वांद्र्यातील खासगी निवासस्थान येथेही ईडीचे पथक दाखल झाले आहे.

हा आहे आरोप

कोट्यावधींची रक्कम घेऊन पोलिसांच्या बदल्या केल्या गेल्याचा आरोप परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर करण्यात आला होता. मुंबई आणि कोकण विभागातील पोलिसांच्या बदल्या या अनिल परब यांच्या सांगण्यावरुन झाल्याचा आरोप करण्यात आला होता. या आरोपांची चौकशी सीबीआयकडून सुरु होती.  या चौकशीसाठी ईडीची टीम आता अनिल परब यांच्या शासकीय निवासस्थानी पोहोचली आहे.

( हेही वाचा: राज्यातील विधान परिषदेच्या 10 जागांसाठी या तारखेला होणार मतदान )

अनिल परब आणि छापेमारी

  • परब यांनी दापोलीत अनधिकृत रिसाॅर्ट बांधल्याचा भाजप नेते किरीट सोमय्यांचा आरोप
  • काही दिवसांपूर्वी परब यांच्याशी संबंधित काही व्यक्तींवर आयकर विभागाने छापेमारी केली होती.

या ठिकाणी छापेमारी सुरु

  • अनिल परबांचे निकटवर्तीय बजरंग खरमाटेंच्या निवासस्थानी छापेमारी
  • अनिल परब यांच्या शासकीय निवासस्थानी छापेमारी
  • वांद्र्यातील राहत्या घरी छापेमारी
  • परबांच्या सीएच्या घरी छापेमारी
  • दापोली रिसाॅर्ट

 

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.