प्रत्येक आर्थिक वर्षात करदात्यांना कराचा भरणा करण्यासाठी आयटीआर फॉर्म भरावा लागतो. या फॉर्ममध्ये योग्य त्या माहितीचा भरणा करुन कर द्यावा लागतो. 2022-23 या आर्थिक वर्षात कर भरणा करण्यासाठी आयकर विभागाकडून आयटीआर फॉर्म नुकताच प्रसिद्ध करण्यात आला आहे. या फॉर्ममध्ये आता करदात्यांना अधिकची माहिती भरावी लागणार आहे.
(हेही वाचाः एका वर्षात बँकेत इतकी रक्कम जमा करताय? मग Income Taxच्या नियमात झालाय मोठा बदल)
करपात्र व्याज
ईपीएफ(EPFO)मध्ये जर 2.5 लाखापेक्षा अधिकची रक्कम जमा केली असेल तर उत्पन्नावर कर भरावा लागणार आहे. यावर मिळणा-या व्याजाची आयटीआर फॉर्ममध्ये माहिती द्यावी लागणार आहे.
रहिवासाची स्थिती
आयटीआर फॉर्म 2 किंवा 3 भरणा-या करदात्यांना आपली रहिवाशी स्थिती दाखवण्यासाठी आवश्यक तो पर्याय निवडावा लागणार आहे.
नूतनीकरण
जमिनीच्या नूतनीकरणावर जर का खर्च करण्यात आला असेल, तर त्याची माहिती देखील आयटीआर फॉर्ममध्ये द्यावी लागणार आहे. या खर्चाला दीर्घकालीन नफ्यातून बाहेर काढण्यासाठी विक्री किंमतीतून वजा करावे लागणार आहे.
(हेही वाचाः EPFO: या चुका झाल्या तर तुमचे PF अकाऊंट बंद होऊ शकते)
जमिनीची विक्री
1 एप्रिल 2021 ते 31 मार्च 2022 या काळात एखादी जमीन किंवा बिल्डिंग खरेदी किंवा विक्री केली असेल, तर भांडवली नफ्याअंतर्गत खरेदी-विक्रीच्या व्यवहाराची तारीख सांगावी लागणार आहे.
भांडवली नफा
याआधी भांडवली नफा लिहिताना केवळ इंडेक्स कॉस्ट(निर्देशांक खर्च)ची माहिती द्यावी लागत होती. मात्र आता या आर्थिक वर्षापासून मूळ किंमत सांगावी लागणार आहे.
Join Our WhatsApp Community