गेल्या काही दिवसांपासून राजकारणात नेते मंडळी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडत आहेत. भाजप विरुद्ध महाविकास आघाडी आमने-सामने आले असून अशातच भाजप नेते खासदार सुजय विखे पाटील यांनी राष्ट्रवादीवर हल्लाबोल केल्याचे पाहायला मिळत आहे.
काय म्हणाले सुजय विखे पाटील
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जन्म हा महाविकास आघाडीमध्ये शिवसेना संपवण्यासाठी झालेला आहे, असे विधान सुजय विखे पाटील यांनी केले. तसेच ते पुढे असेही म्हणाले, राजे यांच्या उमेदवारीवरून राजकीय चर्चा सुरू असताना या विषयाची सुरुवात कोणी केली. याला ठिणगी कोणी लावली आणि आज आगीत कोण जळतंय हे सर्व महाविकास आघाडीचं चित्र जनता पाहत आहे.
(हेही वाचा – संभाजीराजेंचं भावनिक ट्विट; म्हणाले,“महाराज तुमच्या नजरेतलं…” )
शिवसेना हा पक्ष गेल्या 3 वर्षात फक्त आरोप सहन करण्यातच मग्न आहे. एका राजकीय पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी छत्रपती संभाजीराजे यांच्या राज्यसभेच्या उमेदवारीपूर्वीच त्यांना पाठिंब्याची घोषणा केली. त्यापूर्वी हा विषय चर्चेत देखील नव्हता. पाठिंब्याची घोषणा करून हा विषय चर्चेला आणला आणि तो विषय सेनेकडे वळविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
सुजय विखे पाटलांचा राष्ट्रवादीवर निशाणा
संभाजीराजे छत्रपती यांना आधी शिवसेनेत प्रवेश करा यानंतर राज्यसभेची संधी देऊ, या ऑफरवर शिवसेना ठाम होती. तर दुसरीकडे संभाजीराजे शिवसेनेत जाण्यास नकार देत अपक्ष उमेदवार म्हणूनच लढण्यावर ठाम असल्याचे त्यांनी म्हटले. अखेर शिवसेनेने त्यांना धक्का देत आपले कोल्हापूरचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांना राज्यसभेची उमेदवारी जाहीर केली आहे. यानंतर सुजय विखे पाटलांनी राष्ट्रवादीवर हल्लाबोल केला आहे.