महाराष्ट्र राज्यातील महाविकास आघाडी सरकारचे विविध विभाग आणि जिल्हा परिषदेअंतर्गत 2 लाख 44 हजारांपेक्षा अधिक पदे रिक्त असल्याचे, उघड झाले आहे. शासकीय विभाग व जिल्हा परिषदेतील 31 डिसेंबर, 2020 पर्यंतची माहिती उपलब्ध करून दिली. एकूण 29 शासकीय विभाग आणि जिल्हा परिषद यात मंजूर पदांची संख्या 10 लाख 70 हजार 840 इतकी आहे. यापैकी 8 लाख 26 हजार 435 ही पदे भरली आहेत, तर 2 लाख 44 हजार 405 इतकी पदे रिक्त आहेत.
माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांना महाराष्ट्र शासनाने दिली आहे. अनिल गलगली यांनी महाराष्ट्र शासनाकडे 11 मे 2022 रोजी अर्ज सादर करत, महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत सर्व वर्गातील एकूण पदांची माहिती देताना मंजूर पदे, भरलेली पदे आणि रिक्त पदांची माहिती मागितली होती. सामान्य प्रशासन विभागाने अनिल गलगली यांस गटनिहाय शासकीय व जिल्हा परिषदेतील गट अ, ब, क आणि ड मधील दिनांक 31 डिसेंबर 2020 पर्यंतची माहिती उपलब्ध करुन दिली. एकूण 29 शासकीय विभाग आणि जिल्हापरिषद यात मंजूर पदांची संख्या 10 लाख 70 हजार 840 इतकी आहे. ज्यापैकी 8 लाख 26 हजार 435 पदे भरली आहेत. तर 2 लाख 44 हजार 405 ही पदे रिक्त आहेत. यात शासकीय कर्मचाऱ्यांची 1 लाख 92 हजार 425 तर जिल्हापरिषदेच्या 51 हजार 980 अशी एकूण 2 लाख 44 हजार 405 पदे रिक्त आहेत.
सर्वाधिक गृह विभागाची पदे रिक्त
गृह विभागाची एकूण मंजूर पदे 2 लाख 92 हजार 820 असून, त्यापैकी 46, हजार 851 पदे रिक्त आहेत. सार्वजनिक आरोग्य विभागाची एकूण मंजूर पदे 62, हजार 358 असून त्यापैकी 23, हजार 112 पदे रिक्त आहेत. जलसंपदा विभागाची एकूण मंजूर पदे 45 हजार 217असून त्यापैकी 21, हजार 489 पदे रिक्त आहेत. महसूल व वन विभागाची एकूण मंजूर पदे 69, हजार 584 असून त्यापैकी 12, हजार 557 पदे रिक्त आहेत. उच्च व तंत्र विभागाची एकूण मंजूर पदे 12, हजार 407 असून त्यापैकी 3, हजार 995 पदे रिक्त आहेत. वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाची एकूण मंजूर पदे 36 हजार 956 असून त्यापैकी 12 हजार 423 पदे रिक्त आहेत. आदिवासी विकास विभागाची एकूण मंजूर पदे 21 हजार 154 असून, त्यापैकी 6 हजार 213 पदे रिक्त आहेत.
( हेही वाचा काही नेते जे बोलतात तेच कसे काय घडते? अजित पवारांचा भाजप आणि केंद्रीय तपास यंत्रणांवर हल्लाबोल )
30 ते 50 टक्क्यांपर्यंत पदे रिक्त
अनिल गलगली यांच्या मते रिक्त पदामुळे सेवेत दिरंगाई होते आणि सामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. मुख्यमंत्री आणि उप मुख्यमंत्री यांच्या अखत्यारीत असलेल्या विभागात रिक्त पदांची संख्या अधिक आहे. सरासरी 23 टक्के पदे रिक्त असली, तरी काही विभागात 30 ते 50 टक्क्यांपर्यंत पदे रिक्त असल्याची, खंत अनिल गलगली यांनी व्यक्त केली आहे .
Join Our WhatsApp Community