बांगलादेश विरुद्ध श्रीलंका यांच्यातील कसोटी सामना अनिर्णीत राहिल्यानंतर, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने जाहीर केलेल्या नव्या कसोटी क्रमवारीनुसार, रवींद्र जडेजा अव्वल अष्टपैलू म्हणून कायम राहिला आहे. तसेच, भारताचे स्टार क्रिकेटर विराट कोहली आणि कर्णधार रोहित शर्मा यांनी फलंदाजीत अव्वल दहामध्ये स्थान कायम राखले आहे.
अशी आहे जागतिक क्रमवारी
ऑस्ट्रेलियाचा मार्नस लाबुशेन अव्वल स्थानी असून, रोहित आठव्या तर कोहली दहाव्या स्थानी कायम आहे. गोलंदाजांमध्ये ऑस्ट्रेलियाचाच पॅट कमिन्स पहिल्या, तर भारताचा रविचंद्रन अश्विन दुस-या स्थानी आहे. भारताचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह तिस-या स्थानी विराजमान आहे.
( हेही वाचा :म्हाडा घरांसाठीच्या उत्पन्न मर्यादेत वाढ )
जडेजाच अव्वल
अष्टपैलू खेळाडूंमध्ये भारताच्या रवींद्र जडेजाने आपले अव्वल स्थान कायम राखले आहे. वेस्ट इंडिजचा अनुभवी जेसन होल्डर व बांगलादेशचा स्टार शाकिब अल हसन हे अनुक्रमे दुस-या आणि तिस-या स्थानावर कायम आहेत.
Join Our WhatsApp Community