SBI मध्ये मॅनेजर, डेप्युटी मॅनेजर होण्याची संधी! परीक्षेविना मुलाखत, किती असणार पगार?

161

सार्वजनिक क्षेत्रातील देशातील सर्वात मोठी बँक म्हणून स्टेट बँक ऑफ इंडियाला ओळखले जाते. त्यामुळे स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी करण्याची तुमचीदेखील इच्छा असेल आणि तुम्ही बँकेच्या परीक्षा देत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने स्पेशालिस्ट केडर ऑफिसरच्या पदांसाठी भरतीचे नोटिफिकेशन जारी केले आहे. या भरतीमध्ये एजीएम, मॅनेजर आणि डेप्युटी मॅनेजरच्या जागांवर पदांची भरती होणार आहे. इच्छूक उमेदवार 12 जूनपर्यंत अर्ज करू शकणार आहेत.

SBI SCO Recruitment 2022 Application Form अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा…

काय आहे शैक्षणिक अर्हता

स्टेट बँकेकडून जारी करण्यात आलेल्या नोटीफिकेशननुसार, 21 मे 2022 पासून 32 पदांसाठी ऑनलाइन अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. शॉर्टलिस्टिंग आणि मुलाखतीच्या आधारे या पदांसाठी उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. एजीएम पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून 60% गुणांसह BE/B.Tech असणे आवश्यक आहे. तर डेप्युटी मॅनेजर पदाकरता मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेकडून स्टॅटिस्टिक्स पदवी असणे आवश्यक आहे. या भरतीअंतर्गत विविध शैक्षणिक पात्रता असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. अधिक माहितीसाठी उमेदवारांनी अधिकृत नोटिफिकेशन पहावे.

(हेही वाचा – SBI ग्राहकांना सरकारचा इशारा, ‘हा’ मेसेज त्वरीत डिलीट करा; अन्यथा…)

अशी आहे वयाची मर्यादा

  • एजीएमसाठी वय (आयटी टेक ऑपरेशन्स, आयटी इनबाउंड इंजिनीअर, आयटी आउटबाउंड इंजिनीअर, आयटी सिक्युरिटी स्पेशलिस्ट) 45 वर्षे, मॅनेजर (आयटी सिक्युरिटी स्पेशलिस्ट) चे वय 38 वर्षे असणे आवश्यक आहे.
  • डेप्युटी मॅनेजर (नेटवर्क इंजिनीअर, साइट इंजिनीअर कमांड सेंटर) वय 35 वर्षे असणे आवश्यक आहे.

किती असणार पगार

  • एजीएम पदासाठी 89,890 ते 1,00,350 रुपये प्रति महिना वेतन दिले जाणार आहे.
  • मॅनेजर पदासाठी, 63,840 ते 78,230 रुपये आणि डेप्युटी मॅनेजर पदासाठी 48,170 ते 69,810 रुपये वेतन दिले जाणार आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.