भारतीय रेल्वेचे जाळे संपूर्ण देशभरात पसरलेले आहे म्हणूनच बहुतांश लोक कुठेही जाताना रेल्वेने प्रवास करण्यास प्राधान्य देतात. ट्रेनमध्ये प्रवासादरम्यान अनेक प्रकारच्या सोयीसुविधा सुद्धा प्रवाशांना दिल्या जातात. परंतु ट्रेनने प्रवास करायचा असेल तर तुम्हाला कन्फर्म रिझर्व्हेशन मिळण्यासाठी आगाऊ तिकीट बुक करावे लागते. कारण कोकणासारख्या ठिकाणी जाण्यासाठी २ ते ३ महिने आधीच वेटिंग लिस्ट लागते. अशावेळी आरक्षित जागा न मिळाल्यास अनेक लोक वेटिंग तिकीटे कॅन्सल करतात. वेटिंग तिकिटांचा तुम्हाला किती परतावा मिळेल याबाबत जाणून घेऊया…
( हेही वाचा : परिचारिकांच्या धुलाई भत्त्यावर केंद्राकडून सर्फ पावडर तर राज्याकडून माती – दरेकर)
वेटिंग तिकीट रद्द केल्यास परतावा
रेल्वे तिकीट विक्रीपासून ते तिकीट रद्द करण्यापर्यंतचे नियम भारतीय रेल्वेने आधीच ठरवले आहेत. तुम्हीही रेल्वेचे तिकीट रद्द केले तर तुम्हाला रद्दीकरण शुल्क भरावे लागते.
वेटिंग किंवा RAC तिकीट रद्द करायची असेल तर तुम्ही ट्रेन सुटण्यापूर्वी ३० मिनिटे आधी तुमचे तिकीट रद्द करू शकता. RAC तिकीट रद्द करण्यासाठी ६० रुपये तर वेटिंग तिकीट रद्द करण्यासाठी तुम्हाला ६५ रुपये भरावे लागतील आणि तुमचे तिकिटाचे उर्वरित पैसे तुम्हाला परत केले जातील.
ठराविक वेळेआधी ऑनलाईन वेटिंग तिकीट रद्द केल्यास परतावा तुमच्या बॅंक खात्यात जमा केला जाईल. या दरम्यान काही अडचण असल्यास तुम्ही 07556610661 या क्रमांकावर कस्टमर केअरशी संपर्क साधू शकता.
जर तुम्ही ऑफलाईन म्हणजेच काउंटरवरून वेटिंग ट्रेनचे तिकीट घेतले तर तुम्हाला रिफंड मिळवण्यासाठी ट्रेनच्या तिकीट काउंटरवर जावे लागेल. ऑफलाईन पद्धतीत सुद्धा वेळेत तिकीट रद्द केल्यास तुम्हाला परतावा मिळेल.
Join Our WhatsApp Community