रेल्वेची प्रवासी संख्या मोठी आहे, लागोपाठ सुट्ट्या आल्या की गाड्यांमध्ये प्रचंड गर्दी होते. अशावेळी जनरल तिकीटाचे पॅसेंजर अनेकवेळा आरक्षित डब्यांमध्ये घुसून सीट बळकवतात. काही वेळा टीसींना हाताशी घेऊन किंवा सोबत महिला प्रवासी लहान मुले आहेत काहीतरी विचार करा असे सांगून सुद्धा आरक्षित सीटचा ताबा घेतला जातो आणि अधिकृत प्रवाशाला सीटवर बसायलाही मिळत नाही अशावेळी कोणाकडे तक्रार करायची याविषयी जाणून घेऊया…
आरक्षित सीट कोणी बळकावली तर काय कराल?
- जर तुमच्या हक्काच्या सीटवर तुम्हाला बसायला मिळत नसेल तर तुम्ही ‘रेल मदत’ ( rail madad) या अॅपची मदत घेऊ शकता.
- या अॅपवर तुम्ही पीएनआर (PNR) क्रमांक समाविष्ट करून तक्रार दाखल करू शकता. ही तक्रार थेट रेल्वेच्या आरपीएफ डिपार्टमेंटकडे जाते.
- रेल मदत अॅपवर तुमच्या तक्रारीची दखल घेतली जाते आणि तात्काळ तुमच्या आरक्षित सीटजवळ टीसी हजर होतो. तसेच ज्या प्रवाशाने बेकायदा सीट बळकावली अशा प्रवाशांना तक्रार केल्यावर गाडी ज्या स्थानकावर थांबेल तेथील आरपीएफकडून जाब विचारून कारवाई केली जाते.
- https://railmadad.indianrailways.gov.in/madad/final/home.jsp वर तक्रार नोंदवा अन्यथा १३९ वर कॉल करा.