ओमायक्रॉनच्या विषाणूमुळे राज्यातील रुग्णसंख्या आता भलत्याच वेगाने वाढायला सुरुवात झाली आहे. गुरुवारी एकट्या मुंबईत ३५० नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. मुंबईसह राज्यभरात एकूण ५५१ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. वाढत्या रुग्णसंख्येमुळे गुरुवारी रुग्ण बरे होण्याचा दर थोडासा कमी झाल्याचे दिसून आले. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ९८.०९ टक्क्यांपर्यंत घसरले आहे.
अशी आहे राज्यातील स्थिती
खूप दिवसांनंतर गुरुवारी कोरोना उपचारांत मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. राज्यात एका कोरोनाबाधित रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.८७ टक्के एवढा आहे. वाढत्या कोरोना रुग्णांमुळे आता राज्यात २ हजार ३६१ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून ८ कोटी ८ लाख १३ हजार ३४६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ७८ लाख ८४ हजार ३२९ रुग्णांमध्ये कोरोना विषाणू आढळला आहे.
Join Our WhatsApp Community