वीजप्रवाह खंडित झाल्याने, मध्य रेल्वे मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत झाली आहे. या मार्गावरील अप आणि डाऊन दिशेला जाणा-या गाड्या 10 ते 15 मिनिटे उशिराने धावत असल्याची माहिती आहे. ठाणे आणि कांजूरमार्ग स्थानकादरम्यान वीजप्रवाह काही काळासाठी खंडीत झाल्याने, लोकल सेवेवर परिणाम झाल्याचे सांगितले जात आहे. सकाळीच लोकल वाहतूक विस्कळीत झाल्याने, कामावर जाण्यासाठी घराबाहेर पडलेल्या नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
मुंबईत पुर्वमोसमी पावसाने सुरुवात केली आहे. पडलेल्या या पुर्वमोसमी पावसामुळे लोकल वाहतुकीवर परिणाम झाला आहे. दोन दिवसांपूर्वी हार्बर मार्गावरील लोकल सेवा ठप्प झाली होती. ऐन कामाला जाण्याच्या वेळेत लोकल उशिराने असल्याने, प्रवाशांची गैरसोय होत आहे.
( हेही वाचा: Ravi Shastri B’Day Special: क्रिकेट विश्वातील एक ‘अष्टपैलू’ व्यक्तिमत्त्व )
Join Our WhatsApp Community