दरड कोसळून दुर्घटना झाल्यास शिवसेना जबाबदार; ‘आप’चा इशारा

151

येत्या पावसाळ्यात मुंबईत दरड कोसळण्याची घटना घडण्याची सत्ताधारी शिवसेना वाट बघत आहे का असा सवाल करत दरड कोसळून नाहक मुंबईकरांचे बळी गेल्यास याला शिवसेना कारणीभूत असेल असा इशारा आम आदमी पार्टीने(आप)दिला आहे.

मुंबई हे टेकड्यांचे शहर असून पूर्वीच्या स्थायिकांनी निवास करण्याच्या उद्देशांने काही टेकड्या काळजीपूर्वक विकसित केल्या आहेत. लोकसंख्येच्या स्फोटामुळे झोपडपट्ट्यांचे अतिक्रमण कोणत्याही सुरक्षिततेच्या उपाययोजना न करता टेकड्यांवर वसलेले आहेत. आरटीआय कार्यकर्ते श्री. अनिल गलगली यांनी सादर केलेल्या २०२१ च्या महितीच्या अधिकारा अंतर्गत मिळवलेल्या माहितीनुसार ३२७ दरडप्रवण क्षेत्र असून २२,४८३ कुटुंबांना पावसाळ्यात धोका असतो. यावर मुंबई महानगर पालिका दावा करत आहे की, २९१ दरडप्रवण क्षेत्रे आहेत. मुंबई महानगर पालिका आपली जबाबदारी झटकण्यासाठी खोटी आकडेवारी जारी करत असल्याचा आरोप आपच्या प्रिती मेमन यांनी केला आहे.

( हेही वाचा : दागिन्यांवर हॉलमार्क बंधनकारक, वाहन विमा महागणार! १ जून पासून कोणते बदल होणार वाचा…)

२०२१ मध्ये चेंबूरमधील भारत नगर आणि विक्रोळीतील सूर्यानगर येथे दरड कोसळण्याची घटनेत ३० हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी या पूरप्रवण क्षेत्रांना सुरक्षित करण्यासाठी ६१.४८ कोटी रुपयांचा निधी दिला होता. परंतु दुर्दैवाने या लोकांच्या सुरक्षेसाठी काहीही झाले नाही. कारण ते सर्वात गरीब आहेत आणि मुंबईत गरिबांच्या जीवाची किंमत नाही असा आरोपही आम आदमी च्या नेत्यांनी आयोजित पत्रकार परिषदेत केला.

पावसात दरडप्रवण क्षेत्रात घडणाऱ्या घटना थांबण्याकरिता कोणतीही उपाययोजना मुंबई महानगरपालिकेकडून करण्यात आलेली नाही आहे. आम आदमी पार्टीच्या मुंबई अध्यक्षा प्रीती शर्मा मेनन यांनी आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांसोबत चेंबूर येथील आंबेडकर नगरला भेट दिली. ज्या कुटुंबांची घरे पूर्णपणे तुटलेली आहेत त्यांना तात्पुरते स्थलांतरित करण्यात आले आहे. परंतु उर्वरित कुटुंबांना तेथे धोका असल्याचे निदर्शनात आले. तसेच भिंत बांधण्याचे किंवा ढिगारा हलविण्याचेही काम झालेले नसल्याची खंत निदर्शनास आली, असे त्यांनी सांगितले.

आम आदमी पार्टी नेते पायस वर्गीस यांच्या यांनी आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांसोबत विक्रोळी येथील सूर्यनगरला भेट दिली. गेल्या वर्षी कोसळलेली अनिश्चित भिंत दयनीयपणे तात्पुरती डागडुजी करण्यात आली आहे. ज्या कुटुंबांची घरे तुटली होती, त्यांचे पुनर्वसन झाले नाही. तर त्यांना अल्प रक्कम दिली गेली, परिणामी त्यांनी पुन्हा तिथेच राहण्याची जागा भाड्याने घेतली आहे. डेंजर झोनमधील इतर अनेक घरे अजूनही मृत्यूच्या छायेखाली उभी आहेत असेही आपच्या नेत्यांनी अनुभव कथन केले.

पावसाळ्यात अनेक नागरिकांचे नाहक बळी जातात

प्रीती शर्मा मेनन यांनी मालाडमधील कुरार गावालाही भेट दिली जिथे २०१९ मध्ये जलाशयाची भिंत कोसळून ३० लोकांचा मृत्यू झाला होता. भिंत पुन्हा बांधली गेली नाही किंवा मलबा साफ केला गेला नाही. ज्या ३० कुटुंबांची घरे उध्वस्त झाली आहेत त्यांना दूरच्या माहुलमध्ये स्थलांतरित करण्यात आले आहे. रेड झोनमध्ये असलेल्या उर्वरित ७५ घरांचे पुनर्वसन न झाल्याने वर्षभरापासून ते धरणे धरून बसले आहेत. शेवटच्या दोन पावसात त्यांना काही दिवसांसाठी वारंवार शाळेत हलवले जात होते आणि पुन्हा त्यांना त्या जागी आणून ठेवले जाते.

मुंबई महानगरपालिका २५००० कुटुंबांचे पुनर्वसन का करू शकत नाही आणि या डोंगरांना वेढा का घालू शकत नाही? भ्रष्टाचार आणि राजकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळे दर पावसाळ्यात अनेक नागरिकांचे नाहक बळी जातात. आदित्य ठाकरे निधी वाटपाचे श्रेय घेतात आणि या कामांवर कथितपणे देखरेख करतात, मग आपत्तींचे श्रेय देखील त्यांच्याकडेच आहे. नागरिकाच्या मृत्यूचे रक्त सत्ताधारी शिवसेनेच्या हातावर असून त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी मागणी आम आदमी पार्टीच्या मुंबई अध्यक्षा प्रीती शर्मा मेनन यांनी आयोजित पत्रकार परिषदेत केली.

मुंबई महानगरपालिका दावा करत आहे की, एनडीआरएफ टीम तैनात करण्यात येणार आहे. परंतु ही टीम फक्त रहिवाशांना त्यांच्या घरांमध्ये पूर आल्यावर हलवतात, ते ही काही दिवसांसाठी. त्यांना सहसा अशा शाळेत ठेवले जाते जिथे जेवणाची सोय नसते. या अनियंत्रित हालचालीमुळे त्यांचे जीवनमान उद्ध्वस्त होते असून तरुणांच्या शिक्षणात अडथळा येतो, असे त्यांनी सांगितले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.