मुंबई हे गर्दीचं शहर असून मोठ्या प्रमाणात वाहनं देखील येथे पाहायला मिळतात. त्यामुळे वाढती वाहनं आणि त्यांचे कर्णकर्कश हॉर्न ही मुंबईकरांसाठी नेहमी चिंतेची बाब असते. मात्र मुंबई पोलीस याला देखील सामोरे जाताना दिसताय. अशातच मुंबई ट्राफिक पोलिसांनी एक अनोखी मोहीम शनिवारी दोन तास राबविण्याचे ठरवले आहे. या शनिवारी मुंबईला हॉर्नपासून विश्रांती देऊया, असे कॅप्शन देत मुंबई पोलिसांनी ट्राफिक पोलिसांनी एक ट्विट केले आहे.
(हेही वाचा – शिवसेना, मनसेनंतर आता बच्चू कडूही करणार अयोध्या दौरा! )
या ट्विटनुसार, मुंबई पोलिसांनी शनिवारी दोन तास नो हॉन्किंग डे अर्थात ५ ते ७ असे दोन तास विनाकारण हॉर्न वाजवू नका अशी संकल्पना राबवण्याचे ठरवल्याचे दिसून येत आहे. यानुसार, मुंबईतील महत्वाच्या १०० चार रस्त्यांवर याची माहिती देणारे फलक लावले जाणार आहेत. यामुळे मुंबई पोलिसांची नजर खासकरून त्या दुचाकीस्वारांवर असणार आहे, जे कारण विनाकारण मोठ्याने हॉर्न वाजवतात अशा दुचाकीस्वारांवर कारवाई करण्याचा मुंबई पोलिसांचा मानस आहे. त्यामुळे जर तुम्ही मुंबईकर आहात आणि कारण नसताना जर हॉर्न वाजवत असाल तर सावध रहा…
चला, या शनिवारी मुंबईला हॉर्नपासून विश्रांती देऊया!
मुंबई वाहतूक पोलिसांचा एक खास नवा उपक्रम, शनिवार, २८ मे २०२२ रोजी संध्याकाळी ५-७ संपूर्ण मुंबईमध्ये 'नो हॉर्न'!#PauseTheHonk #HornFreeMumbai pic.twitter.com/AGEADp0tHo
— Mumbai Traffic Police (@MTPHereToHelp) May 26, 2022
असे सांगितले जात आहे की, मुंबईत रस्त्यावरुन जाणाऱ्या महिला, गर्भवती महिला, मुलं यांना या हॉर्नमुळे त्रास होतो. त्याशिवाय मुंबईकरांनीही मानसिक आणि शारिरीक त्रासाला सामोरे जावे लागत असल्याच्या तक्रारी केल्याचे समोर आले आहे. नीट झोप न लागणे किंवा काहीशी कर्णबधीरता येणे अशा प्रकारच्या तक्रारीही नोंदवल्या गेल्याची माहिती मिळतेय. त्यामुळे वाहन जरूर चालवा पण ते चालवतांना आपल्यामुळे इतरांना त्रास होणार नाही, याची काळजी देखील घ्या…
Join Our WhatsApp Community