कंत्राटी नियुक्त्या आणि प्रशासकीय बदल्या आदी मागण्यांबाबत सरकारकडून लेखी आश्वासन न आल्याने महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेने शुक्रवारी दुपारी अखेर राज्यभरातील सरकारी रुग्णालये, दवाखान्यात बेमुदत संपाची घोषणा केली. संपाचे चार दिवस उलटूनही पाचव्या दिवशीही सरकारी पातळीवरुन दखल घेतली जात नसल्याने आता संप अनिश्चित काळासाठी सुरुच राहील, अशी माहिती महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेच्या अध्यक्षा मनिषा शिंदे यांनी दिली.
संप अनिश्चित काळासाठी सुरु राहणार
परिचारिका संघटनेने तीन दिवसांच्या संपाची पूर्वकल्पना सर्व सरकारी रुग्णालयांना दिली होती. मात्र २८ तारखेपासून बेमुदत संप जाहीर करण्यापूर्वी आज शुक्रवारी सकाळी विविध सरकारी रुग्णालयातील अधिष्ठात्यांना संघटनेच्या कर्मचाऱ्यांनी शनिवारपासून राज्यातील १९ हजार परिचारिका कोणत्याही सरकारी रुग्णालयात तसेच दवाखान्यात दिसणार नाही. तर मुंबईतील जेजे रुग्णालयातील अधिष्ठाता डॉ पल्लवी सापळे यांनी सर्व विभागातील प्रमुखांची दुपारी बैठक घेत कामकाजाचा आढावा घेतला. संप अनिश्चित काळासाठी सुरु राहणार असल्याने आढावा बैठक घेतली.
(हेही वाचा – सरकारने परिचारिकांना संकटकाळात देवदूत बोलण्याचे नाटक केले – प्रवीण दरेकर)
आरोग्य सेवेतील मनुष्यबळातील वापराबाबत निर्णय होणार
काम बंद आंदोलनाच्या दुस-या दिवशीही रुग्णसेवेत सरकारी रुग्णालयांत अडथळे येत असताना मनुष्यबळ तपासण्यासाठी वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचलनालयात दुपारी उच्च स्तरीय बैठक बोलावण्यात आली. या बैठकीत राज्यातील आरोग्य सेवेतील मनुष्यबळातील वापराबाबत निर्णय घेतला जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.
Join Our WhatsApp Community