मुंबईतील कॉर्डिलिया क्रूझ ड्रग्सप्रकरणात सहभागी असल्याचा आरोप असलेल्या शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला क्लीन चिट देण्यात आली आहे. त्यामुळे आता एनसीबीचे तत्कालीन अधिकारी समीर वानखेडे यांच्या अडचणीत मात्र वाढ झाल्याचे समजत आहे. वानखेडे यांच्याविरोधात आता थएट केंद्र सरकारकडून कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत.
आर्यन खान ड्रग्सप्रकरणी चुकीच्या पद्धतीने कारवाई केल्यामुळे सरकारने समीर वानखेडेंवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच या प्रकरणाच्या चौकशीसाठी एका सक्षम अधिका-याची नियुक्ती करण्यास सांगण्यात आले आहे.
(हेही वाचाः अनिल देशमुखांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल)
वानखेडेंकडून चूक
अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याच्याविरोधात आरोपपत्र सादर करण्यासाठी न्यायालयाने 60 दिवसांचा कालावधी वाढवून दिला होता. हा कालावधी शुक्रवार 27 मे रोजी संपला. त्यामुळे न्यायालयात एनसीबीकडून शुक्रवारी पहिले आरोपपत्र सादर करण्यात आले. त्यात आर्यन खान आणि मेहककडे ड्रग्स सापडले नसल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच यामध्ये आर्यन खान दोषी नसल्याचे समोर आले आहे. त्यानंतर एनसीबीचे डीजी एस एन प्रधान यांनी समीर वानखेडे आणि त्यांच्या टीमकडून मोठी चूक झाल्याचे कबूल केले आहे.
14 जणांकडे सापडले ड्रग्स
समीर वानखेडे आणि त्यांच्या टीमने योग्य पद्धतीने या प्रकरणाचा तपास केला असता तर हे प्रकरण एसआयटीच्या हातात गेले नसते. त्यामुळे या प्रकरणाच्या तपासात नक्कीच काहीतरी चुका झाल्या असतील. आम्हाला या प्रकरणात 6 जणांविरोधात कुठलेही पुरावे सापडले नसून, 14 जणांकडे मात्र ड्रग्स आढळून आले आहेत, असे प्रधान यांनी म्हटले आहे.
(हेही वाचाः दुचाकीवर दोघांनाही हेल्मेट सक्तीच्या निर्णयानंतर, सचिनच्या ट्वीटची होतेय चर्चा)
Join Our WhatsApp Community