लडाखमधील अपघातात महाराष्ट्राचे सुभेदार विजय शिंदे आणि लष्करातील जवान प्रशांत जाधव हुतात्मा

146

लडाखमधील तुर्तक सेक्टरमध्ये शुक्रवारी भारतीय लष्करातील जवान प्रवास करत असलेली खासगी बस श्योक नदीत कोसळल्याने, 7 जवान हुतात्मा झाले. हुतात्मा झालेल्या जवानांमध्ये कोल्हापूर आणि सातारमधील दोन जवानांचा समावेश आहे. यात कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्यातील बसर्गे बुद्रुकमधील प्रकाश शिवाजी जाधव तर सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील विसापूर येथील सुभेदार विजय सर्जेराव शिंदे हे भीषण अपघातात हुतात्मा झाले आहेत.

सुभेदार विजय शिंदे 

हुतात्मा सुभेदार विजय शिंदे यांचे पार्थिव त्यांच्या सातारा जिल्ह्यातील विसापूर या मुळ गावी रविवारी पोहोचणार आहे. ते 1998 मध्ये मराठा लाईट इन्फंट्रीमध्ये दाखल झाले होते. विजय शिंदे यांचे वडील सर्जेराव सु्द्धा लष्करात होते, तर बंधू प्रमोद लष्करात कार्यरत आहेत.

( हेही वाचा उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावर सातत्याने टीका करुन भाजपला आसुरी आनंद मिळतो- संजय राऊत )

भारतीय लष्करातील जवान प्रशांत जाधव

जवान प्रशांत जाधव हुतात्मा झाल्याचे समजताच बसर्गेमध्ये ग्रामस्थ तसेच, तरुण मंडळांकडून अंत्यसंस्कारासाठी तयारी सुरु करण्यात आली आहे. प्रशांत जाधव यांचे पार्थिव शनिवारी त्यांच्या गावी पोहोचणार आहे. त्यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.