31 मे रोजी पेट्रोल पंपावर होऊ शकते इंधनाची टंचाई, कारण…

144

पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत घट झाल्यामुळे सर्वसामांन्यांना फार मोठा दिलासा मिळाला आहे. पण आता पेट्रोल पंप चालकांच्या मागणीमुळे 31 मे रोजी पेट्रोल पंपावर इंधनाचा तुटवडा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पेट्रोल पंप चालकांनी डिलर कमिशन वाढवून देण्यासाठी इंधन खरेदी न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे येत्या मंगळवारी राज्यातील पेट्रोल पंपांवर इंधन टंचाई निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

इंधन खरेदी न करण्याचा निर्णय

2017 पासून कंपन्यांनी पेट्रोल पंप चालकांच्या डिलर कमिशनमध्ये वाढ केली नसल्याची माहिती मिळत आहे. मागील काही वर्षांपासून पंप चालकांनी डिलर कमिशन वाढवण्याची मागणी केली होती. मात्र ही मागणी अजूनही पूर्ण झाली नसल्याने आता पंप चालकांनी कंपन्यांविरोधात पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला आहे. 31 मे रोजी डिलर्सनी इंधन खरेदी न करण्याचा निर्णय घेतला आहे.

(हेही वाचाः आता Credit Card चे बिल तुमच्या सोयीनुसार भरा, RBI चा मोठा निर्णय)

कंपन्यांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न 

कमिशन वाढीच्या मागणीसोबतच केंद्र सरकारने इंधनाच्या शुल्कात कपात केल्याने पेट्रोल पंप चालकांना आर्थिक नुकसान सोसावे लागत असल्याचे पेट्रोल पंप डिलर असोसिएशनने सांगितले आहे. त्यामुळे त्याचीही नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी देखील असोसिएशन कडून करण्यात आली आहे. दरम्यान, या आंदोलनाचा ग्राहकांवर कोणताही परिणाम होणार नसल्याचा दावा पेट्रोल पंप डिलर असोसिएशनने केला आहे. इंधन वितरक कंपन्यांचे लक्ष वेधण्यासाठी हा प्रयत्न केला जात असल्याचे पेट्रोल डिलर असोसिएशनचे रवी शिंदे यांनी सांगितले आहे.

(हेही वाचाः IRCTC च्या ‘या’ टूर पॅकेजमध्ये स्वस्तात करा अयोध्येपासून रामेश्वरमपर्यंतचा प्रवास!)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.