28 मे 2022 रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर यांची 139 वी जयंती त्यांचे जन्मगाव भगूर येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी गावातील नागरिकांनी ‘मी सावरकर, मी भूगरकर’ या पुस्तकाचे प्रकाशन केले. त्यानंतर याठिकाणी स्वातंत्र्यवीर सावरकरांनी रत्नागिरीत केलेल्या समाजक्रांतिकार्यावर आधारित ‘समाजक्रांतिकारकाची यशोगाथा’ या माहितीपटाचे प्रकाशन करण्यात आले. या सोहळ्याप्रसंगी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे सदस्य यांच्यासह डॉक्टर तेजस गर्गे व अन्य मान्यवर उपस्थित होते.
(हेही वाचाः #VeerSavarkarजयंतीनिमित्त खासदारांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांना वाहिली आदरांजली)
देशासाठी वेदना सहन करणारे एकमेव स्वातंत्र्यवीर- डॉ. गर्ग
सर्वात प्रथम डॉक्टर तेजस गर्गे यांच्या हस्ते स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन, या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. श्रुती करंजकर या चिमुकलीने स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जीवनावरील आठवणी आपल्या विचारातून ताज्या करण्याचा प्रयत्न केला. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी ब्रिटिशांच्या काळामध्ये याच नाशिकमधून जातीवादी धोरणाविरोधात बंडाचा झेंडा हाताशी घेतला होता. त्यावेळेस माझे आजोबा हे त्यांच्याबरोबर त्यांच्या या कार्यामध्ये सहभागी झाले होते. स्वातंत्र्यवीर सावरकरांशी माझ्या तीन पिढ्यांचा संबंध असून, मला त्याचा अभिमान आहे, असे मत गर्गे यांनी व्यक्त केले. देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी इतक्या वेदना सहन करणारा एकमेव स्वातंत्र्यवीर हा सर्वांना कळलाच पाहिजे, असेही गर्गे यांनी सांगितले.
(हेही वाचाः स्वातंत्र्यवीर सावरकरांची १३९ वी जयंती, मान्यवरांनी केले अभिवादन!)
या प्रसंगी कारगिल युद्धातील मेजर दिपचंद, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय आप्पा करंजकर, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे सदस्य शैलेंद्र चिखलकर,आरती आळे आदी उपस्थित होते. या प्रसंगी दरवर्षी सावरकर स्मारकाची चांगल्या पद्धतीने देखरेख करणाऱ्या बायजा बाईंचा विशेष सत्कार या ठिकाणी डॉक्टर तेजस गर्गे यांच्या हस्ते करण्यात आला.
Join Our WhatsApp Community