भ्रष्टाचार रोखण्यासाठी पोलिसांना ‘ऑन द स्पॉट पोस्टिंग’!

169

मुंबईतील पोलीस दलातील सर्वसाधारण बदल्यांमध्ये होणाऱ्या भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी अभूतपूर्व निर्णय घेतला. कार्यकाळ संपलेल्या शेकडो सहायक उपनिरीक्षकापासून ते निरीक्षकापर्यंत सर्व अधिकाऱ्यांना ‘ऑन द स्पॉट’ दुसऱ्या ठिकाणी पोस्टिंग देण्यात आले आहे. ‘ऑन द स्पॉट’ करण्यात आलेल्या पोस्टिंगमध्ये कुठलाही आर्थिक व्यवहार अथवा वशिलेबाजी झालेली नसून या बदल्यांमध्ये केवळ पारदर्शकता जपण्यात आली आहे.

( हेही वाचा : मध्य रेल्वे स्थानकांवर लावले जाणार ९०० CCTV कॅमेरे! )

कुठलीही वशिलेबाजी किंवा आर्थिक व्यवहार न करता अनेक मनाप्रमाणे पोस्टिंग मिळालेल्या अधिकाऱ्यांनी या निर्णयाचे स्वागत केले असले तरी मलाईदार पोस्टिंगसाठी (क्रिम पोस्टिंग) ज्यांची धडपड आणि वशिलेबाजी सुरू होती ते मात्र नाराजीचा सूर आवळत असल्याचे दिसून आले. पोलीस दलात क्रिम पोस्टिंग मिळावी यासाठी वशिलेबाजी आणि आर्थिक व्यवहार होत असल्यामुळे पोलीस दल भ्रष्टाचाराने पोखरले गेले आहे. अलीकडच्या काळात, राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे स्वीय सचिव संजीव पालांडे यांनी अंमलबजावणी संचालनालयाला (ईडी) दिलेल्या जबाबात म्हटले होते की वरिष्ठ पोलिसांच्या, विशेषतः आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची महत्वाची भूमिका होती. क्रिम पोस्टिंगसाठी असणारी वशिलेबाजी आणि आर्थिक व्यवहार मोडीत काढण्यासाठी मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी महत्वाची भूमिका घेतली आहे.

२८०० जणांच्या बदल्या …

नुकत्याच झालेल्या सहाय्यक उपनिरीक्षक पासून सहायक पोलिस निरीक्षक सर्वसाधारण बदल्यामध्ये पारदर्शकता दिसून आली आहे. मुंबई पोलीस दलातील २९० सहाय्यक पोलीस निरीक्षक ५०८ पोलीस उपनिरीक्षक आणि २ हजार सहायक पोलिस उपनिरीक्षक ते पोलीस शिपाई यांच्या सर्वसाधारण बदल्या करण्यात आलेल्या आहेत.

‘ऑन द स्पॉट’ पोस्टिंग

बदल्यापुर्वी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकापासून सहाय्यक पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांना पसंतीची तीन ठिकाणे सुचवण्यास सांगण्यात आली होती. या अधिकाऱ्यांना २१ ते २४ मे दरम्यान आयुक्तलयातील भरुचा सभागृहात बोलविण्यात आले होते. मनपसंत जागेसाठी मागविण्यात आलेल्या अर्जात सर्वाधिक पसंती ज्या ठिकाणाला देण्यात आली त्या ठिकाणी सेवाजेष्ठतेनुसार ‘ऑन द स्पॉट’ पोस्टिंग देण्यात आली.

सर्वाधिक पसंतीचे क्रिम ठाणी…

सर्वाधिक पसंती देण्यात आलेल्या पोलीस ठाण्यांपैकी मुलुंड, घाटकोपर, जुहू, ओशिवरा, खार, वांद्रे, दिंडोशी, बोरिवली, कांदिवली, वर्सोवा, मालवणी, सांताक्रूझ, दादर, गावदेवी, डीबी मार्ग, एमआरए, एमआयडीसी, साकिनाका, पवई, एन. एम. जोशी, लो. टी मार्ग, चेंबूर, पायधुनी, भायखळा इत्यादी पोलीस ठाणी आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.