मुंबई महानगरातील आठ पर्यटन स्थळांवर कोविड प्रतिबंधक लसीकरण

156

महापालिकेच्यावतीने मुंबईतील आठ पर्यटन स्थळांवर कोविड-१९ प्रतिबंधक लसीकरण शनिवारपासून सुरू करण्यात आले आहे. यात प्रामुख्याने दक्षिण मुंबईत कुलाबा परिसरातील गेट वे ऑफ इंडिया, काळाघोडा परिसरातील जहांगीर आर्ट गॅलरी, छत्रपती शिवाजी महाराज वस्तूसंग्रहालय, भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालय, अंधेरीतील महाकाली गुंफा, आरे वसाहतीतील छोटा काश्मिर बोटींग क्लब, कुर्ला येथे स्नो वर्ल्ड फिनीक्स सीटी आणि घाटकोपर मध्ये किडझानीया आरसीटी मॉल अशा आठ ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांसाठी लसीकरण सुरू करण्यात आले आहे. या आठही ठिकाणी सर्व लसी या स्थळ नोंदणी(ऑनस्पॉट रजिस्ट्रेशन)द्वारे देण्यात येतील.

(हेही वाचाः जप्त प्लास्टिक विकून महापालिकेने कमवले सुमारे दहा लाख रुपये)

या लसीकरणात कोविशील्ड लस विचारात घेता, १८ वर्षांवरील पात्र नागरिकांसाठी पहिली मात्रा व दुसरी मात्रा, आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन कर्मचारी तसेच ६० वर्षे वयावरील नागरिक यांच्यासाठी प्रतिबंधात्मक मात्रा(बूस्टर डोस) दिला जाईल.

लसीकरणाची संख्या वाढणार

कोवॅक्सिन लस विचारात घेता, १५ वर्षांवरील पात्र व्यक्तींसाठी पहिली मात्रा/दुसरी मात्रा, आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन कर्मचारी तसेच ६० वर्षे वयावरील नागरिकांना प्रतिबंधात्मक मात्रा (बूस्टर डोस) दिली जाईल. तसेच, १२ ते १५ वर्ष वयोगटातील पात्र मुलांसाठी कोरबेवॅक्स या लसीची पहिली व दुसरी मात्रा दिली जाईल. या महत्त्वाच्या पर्यटनस्थळांवर लसीकरण सुरू केल्याने लसीकरणाचा वेग आणखी वाढेल, विशेषत: लहान मुलांचे लसीकरण अधिकाधिक संख्येने होईल, याची महापालिकेच्या आरोग्य प्रशासनाला खात्री आहे.

(हेही वाचाः क्षयरोग रोखण्यासाठी महापालिका आरोग्य कर्मचाऱ्यांच्या हाती ‘शस्त्र’)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.