पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात मधून रविवारी देशवासियांशी संवाद साधला. यावेळी मोदी स्टार्ट अप्सबद्दल बोलताना म्हणाले, स्टार्टअप्समधून देशाला नवी दिशा मिळत आहे. तसेच पुढे स्टार्टअप नवीन भरारी घेताना दिसेल असेही सांगितले. देशातील युनिकॉर्नची संख्या १०० च्या पुढे गेली आहे.
महिला बचत गटातून महिलांचे सक्षमीकरण
यासह मोदी म्हणाले, महिला बचत गट उत्कृष्ट काम करत आहेत. तंजावरच्या बाहुल्यांसह खेळणी आणि कृत्रिम दागिने बनवत आहे. यामुळे महिलांचे सक्षमीकरण होत आहे. पंतप्रधानांनी लोकांना बचत गटांना प्रोत्साहन देण्याचे आवाहन केले. यामुळे आत्मनिर्भर भारत मजबूत होईल. यावेळी उत्तराखंडमधील जोशीमठ येथील कल्पना या विद्यार्थिनीचे उदाहरण दिले. कल्पनाने नुकतीच कर्नाटकातून दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे सांगितले. कल्पनाला कन्नड येत नव्हती, पण कल्पनाने 3 महिन्यांत कन्नड शिकली. कल्पना यांना यापूर्वी टीबी झाल्याचे निदान झाले होते. एवढेच नाही तर तिसरीत असताना तिची दृष्टीही गेली. यातून एक भारत श्रेष्ठ भारत या संकल्पनेला बळकटी मिळत आहे.
(हेही वाचा – अनिल परबांच्या घोटाळ्याची CBI चौकशी व्हावी, सोमय्यांची उच्च न्यायालयात याचिका)
तीर्थक्षेत्र सेवेशिवाय तीर्थयात्राही अपूर्ण
मन की बातमध्ये मोदींनी चार धाम यात्रेचा उल्लेख केला होता. ते म्हणाले, केदारनाथमध्ये काही लोकांकडून पसरवलेल्या अस्वच्छतेमुळे भाविक दु:खी झाले आहेत. अनेकांनी घाणीच्या ढिगाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. आपण पवित्र यात्रेला गेलो तर तिथे घाणीचे ढीग असावेत, हे योग्य नाही. मात्र असे काही भक्त आहेत जे बाबा केदार यांच्या पूजेबरोबरच स्वच्छतेचाही पुढाकार घेत आहेत. तीर्थक्षेत्र सेवेशिवाय तीर्थयात्राही अपूर्ण असल्याचे पंतप्रधान म्हणाले.
“मानवतेसाठी योग” ही यंदाची थीम
पंतप्रधान म्हणाले की 5 जून हा जागतिक पर्यावरण दिन आहे. याबाबत मोहीम राबवायला हवी. रोपे लावा आणि इतरांनाही प्रेरणा द्या, असे ते म्हणाले. पुढे पंतप्रधान म्हणाले की, २१ जून रोजी आपण ८वा आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करणार आहोत. यावेळी ‘योग दिवसाची संकल्पना आहे – “मानवतेसाठी योग”. मी तुम्हा सर्वांना ‘योग दिन’ मोठ्या उत्साहात साजरा करण्याचे आवाहन करतो.