आयपीएलच्या 15व्या मोसमातील अंतिम सामना रविवारी रात्री पार पडणार आहे. गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्समध्ये होणा-या या सामन्यात कोण बाजी मारणार याची सर्वांनाच उत्सुकता आहे. विशेष म्हणजे या सामन्याला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे देखील हजेरी लावणार असल्यामुळे या सामन्याला आता एक महत्व प्राप्त झाले आहे. शहांच्या उपस्थितीसाठी स्टेडियम परिसरात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
असा आहे बंदोबस्त
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा अंतिम सामना खेळवण्यात येणार आहे. या सामन्याला अमित शहा यांच्यासह अनेक सिने कलाकार देखील उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे या सामन्याच्या सुरक्षेसाठी अहमदाबाद पोलिसांकडून कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. स्टेडियम परिसरात 17 डीसीपी, 4 डीआयजीएस, 28 एसीपी, 51 पोलिस निरीक्षक, 268 पोलिस उपनिरीक्षक, 5 हजार पेक्षा जास्त पोलिस शिपाई, 1 हजार होमगार्ड आणि राज्य राखीव पोलिस दलाच्या तीन तुकड्या तैनात ठेवण्यात आल्याचे अहमदाबाद शहराचे पोलिस आयुक्त संजय श्रीवास्तव यांनी सांगितले.
गृहमंत्र्यांचा गुजरात दौरा
28 मे पासून गृहमंत्री अमित शहा हे गुजरात दौ-यावर असून ते राज्यातील विविध कार्यक्रमांमध्ये उपस्थिती दर्शवत आहेत. या त्यांच्या कार्यक्रमापैकीच 29 मे रोजी होणा-या आयपीलच्या अंतिम सामन्याचा देखील समावेश आहे.
Join Our WhatsApp Community