तुम्ही तुमच्या आधारकार्डची फोटोकॉपी (आधारकार्डची झेरॉक्स कॉपी) कोणासोबत शेअर करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. केंद्र सरकारने आधारकार्डबाबत एक नवीन मार्गदर्शक सूचना जारी केली आहे. या नवीन सूचनेत सरकारने देशातील नागरिकांना आवाहन केले आहे की, तुम्ही तुमच्या आधारकार्डचा फोटो, झेरॉक्स कोणासोबत शेअर करू नका. यामुळे तुमच्या आधार कार्डचा गैरवापर होण्याची शक्यता असल्याचे सरकारने सांगितले. तुमच्या आधार कार्डच्या फोटोकॉपीचा गैरवापर टाळण्यासाठी, तुम्ही आवश्यक तिथे आधार कार्डची फक्त मास्क केलेली झेरॉक्स कॉपी शेअर करू शकतात.
(हेही वाचा – आता Mumbai-Pune एक्स्प्रेस वेवर अपघात होण्याची चिंता नाही, कारण…)
सरकारकडून सावधनतेचा इशारा
रविवारी, केंद्र सरकारने एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे नागरिकांना आवाहन केले आहे की, तुमच्या आधार कार्डची फोटो कॉपी एखाद्या व्यक्तीला किंवा संस्थेला देऊ नये. ज्या संस्थांनी UIDAI कडून परवाना घेतला आहे, त्याच संस्था, आस्थापनाने एखाद्या व्यक्तिची माहिती घेण्यासाठी आधारकार्डचा वापर करू शकता. याशिवाय हॉटेल्स किंवा फिल्म्ससारख्या खासगी संस्थांना आधार कार्डच्या प्रती ठेवण्याचा अधिकार नाही, असेही या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
फसवणूक टाळण्यासाठी काय कराल?
आधारकार्डची फसवणूक टाळण्यासाठी केंद्र सरकारने देशातील जनतेला फक्त मास्क केलेले आधारकार्ड शेअर करण्याचा सल्ला दिला आहे. मास्क आधारकार्डमध्ये आधार क्रमांकाचे फक्त शेवटचे ४ अंक दिसतात. यामुळे तुमच्या आधारकार्ड वापरून फसवणूक होण्याची शक्यता खूप कमी होते.
Masked आधार कार्ड म्हणजे?
आधार अधिक सुरक्षित ठेवण्यासाठी मास्क्ड आधार कार्ड उपयोगी येते. मास्क्ड आधार कार्डावर प्रथम ८ अंक क्रॉससारखे दिसतात. तर उर्वरित शेवटचे ४ नंबर दिसतात. मास्क्ड आधार कार्डचा एक विशेष फायदा आहे. तो म्हणजे, जर तुमचे आधार कार्ड हरवले तरी कोणीही त्याचा गैरवापर करू शकत नाही. तुम्ही तुमचे जुने आधार कार्ड मास्क्ड आधार कार्डमध्ये रूपांतरित करू शकता
असे डाउनलोड करा Masked आधार कार्ड
मास्क्ड आधार कार्डमध्ये तुमचा १२ अंकी क्रमांक दिसणार नाही. त्याऐवजी फक्त शेवटचे ४ अंक दिसतील. मास्क्ड आधार कार्ड हा UIDAI च्या वेबसाइटवरून डाउनलोड करता येऊ शकते.
- https://myaadhaar.uidai.gov.in/ या लिंकवर जा.
- तुमचा आधार क्रमांक नमूद करा.
- तुम्हाला Masked Aadhar Card हवाय का हा पर्याय दिसेल, तो निवडावा.
- डाउनलोडचा पर्याय निवडावा.
- आधार क्रमांकातील शेवटचे चार आकड्यांसह आधार कार्डची प्रत मिळवता येईल.