राणा दाम्पत्याच्या मागे गुन्ह्यांची ‘साडेसाती’, आणखी एक गुन्हा दाखल

139

खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी मोतोश्री समोर हनुमान चालिसा पठण करण्याचे आव्हान दिल्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करत त्यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर आता त्यांची जामिनावर सुटका झालेली असताना देखील त्यांच्यावर आता एक नवा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमरावती येथे शनिवारी रॅली काढणं आता राणा दाम्पत्याला भोवलं आहे. विनापरवाना रॅली काढल्यामुळे त्यांच्यावर आता गुन्हा दाखल झाला आहे.

(हेही वाचाः अमरावतीत राणा दाम्पत्याचे जोरदार शक्तिप्रदर्शन)

नवा गुन्हा दाखल

राजद्रोहाचा गुन्हा आणि १४ दिवस कारागृह कोठडीला सामोरे गेलेले खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा हे तब्बल ३६ दिवसांनी शनिवारी अमरावतीत दाखल झाले. त्यावेळी डीजे, फटाक्यांची आतषबाजी, भगवे झेंडे, गाड्यांचा ताफा घेऊन रॅली काढत राणा दाम्पत्याकडून शक्तिप्रदर्शन करण्यात आले. पण ही रॅली विनापरवाना काढण्यात आली असून त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण केल्याप्रकरणी राणा दाम्पत्यासह 100 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. अमरावतीत दोन पोलिस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राणा दाम्पत्याचे शक्तिप्रदर्शन

शनिवारी सायंकाळी पंचवटी येथून खुल्या जीपने राणा दाम्पत्याची मिरवणूक निघाली. मागे तब्बल एक कि.मी. लांब वाहनाच्या रांगा होत्या. रहाटगाव येथे राणा दाम्पत्याचे आगमन होताच बाळू इंगोले यांनी १५ फूट लांब गुलाब पुष्पांचा हार चक्क क्रेनद्वारे आमदार रवी राणा, खासदार नवनीत राणा यांच्या गळ्यात घालण्यात आला. यावेळी जय श्रीराम, पवनसूत हनुमान की जय अशा नाऱ्यांनी आसमंत दणाणून गेला. राणा दाम्पत्य हात उंचावून नागरिक, व्यापारी, दुकानदारांना, वाहनचालकांना अभिवादन करत होते.

(हेही वाचाः अनिल परबांच्या घोटाळ्याची CBI चौकशी व्हावी, सोमय्यांची उच्च न्यायालयात याचिका)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.