पुतीन यांचा मृत्यू! ब्रिटनच्या गुप्तचर यंत्रणेच्या दाव्याने खळबळ

129

रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन हे कॅन्सच्या आजाराने ग्रस्त असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे त्यांची प्रकृती बिघडल्याची माहिती गेल्या काही दिवसांपासून सातत्याने मिळत आहे. त्यातच आता ब्रिटनच्या गुप्तचर यंत्रणेने केलेल्या एका दाव्यामुळे आंतरराष्ट्रीय राजकारणात चांगलीच खळबळ उडाली आहे.

पुतीन यांचा मृत्यू झाला असू शकतो, असा दावा ब्रिटनची गुप्तचर यंत्रणा एमआय 6 कडून करण्यात आला आहे. तसेच ही बातमी लपवून ठेवण्यासाठी या काळात पुतीन यांच्या बहुरुप्याला रशियाच्या अध्यक्षस्थानी बसवले गेल्याचा आरोपही करण्यात येत आहे. ब्रिटनच्या मिरर संकेतस्थळाने द डेली स्टारच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे.

(हेही वाचाः नेपाळमध्ये ४ मुंबईकरांसह २२ जणांना घेऊन जाणारे विमान बेपत्ता!)

MI6 चा दावा

पुतीन यांना रक्ताचा कॅन्सर झाल्याचे काही दिवसांपूर्वी सांगण्यात येत होते. युक्रेनसोबतच्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर माहिती देताना पुतीन माध्यमांसमोर आले त्यावेळी त्यांचा चेहरा फुगलेला दिसत असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळेच पुतीन यांचा मृत्यू झालेला असू शकतो आणि रशियाकडून ही बातमी लपवण्याचा प्रयत्न केला जात असल्याची शंका ब्रिटनची गुप्तचर यंत्रणा एमआय 6 कडून वर्तवण्यात येत आहे.

पुतीन यांनीच केली नियुक्ती?

ज्यावेळी पुतीन हे माध्यमांसमोर दिसले त्यावेळी तो व्हिडिओ आधीच रेकॉर्ड केलेला असू शकतो आणि रशियाच्या विजय दिनाच्या दिवशी मॉस्कोत दिसलेले पुतीन म्हणजे त्यांचा बहुरुप्या(Body Double) असू शकतो अशीही शक्यता वर्तवण्यात येत आहे. स्वतः पुतीन यांनीच आपण आजारी पडल्यानंतर या बहुरुप्याला आपल्या जागी नियुक्त केल्याची शंकाही व्यक्त करण्यात येत आहे.

(हेही वाचाः भारत-अमेरिकेची मैत्री जगात भारी! चीनलाही टाकले मागे)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.