भारतात हिंदुत्वाबाबत बोलणा-या व्यक्तींना लक्ष्य करण्याच्या घटना या सातत्याने घडताना दिसत आहेत. इतकंच नाही तर हिंदुत्वाचा अपमान करण्यापासून रोखणा-यांनाही जीवे मारण्याची धमकी दिली जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. भाजपच्या दिल्लीतील प्रवक्त्या नूपुर शर्मा यांच्याबाबतीत ही घटना घडली आहे. हिंदुत्वाचा अपमान करणा-या कट्टरतावाद्यांना रोखल्यामुळे शर्मा यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. स्वतः नूपुर शर्मा यांनी ट्वीट करत याबाबतची माहिती दिली आहे.
नूपुर शर्मा यांचे ट्वीट
मला आणि माझ्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी देण्यात येत आहे. इस्लामी कट्टरपंथियांकडून हा निंदनीय प्रकार केला जात आहे. आपल्याला आलेल्या या धमकीचे स्क्रीन शॉट ट्वीटद्वारे शेअर करत नूपुर शर्मा यांनी दिल्ली पोलिसांना सूचना दिल्या आहेत. त्यांच्या या ट्वीटला दिल्ली पोलिसांकडून उत्तर देण्यात आले आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आली असून, संबंधितांवर कारवाई करण्याचे आदेश अधिका-यांना देण्यात आल्याचे या उत्तरात म्हटले आहे.
:@DelhiPolice @CPDelhi I am getting continuous death and beheading threats against my family and myself which are egged on by @zoo_bear because of his attempts to incite communal passions and vitiate the atmosphere by building a fake narrative.
Attaching a few pics. Please note. pic.twitter.com/QmgA2uRCrS
— Nupur Sharma (@NupurSharmaBJP) May 27, 2022
(हेही वाचाः पुतीन यांचा मृत्यू! ब्रिटनच्या गुप्तचर यंत्रणेच्या दाव्याने खळबळ)
काय आहे प्रकरण?
ज्ञानवापी मस्जिदीवरुन होत असलेल्या वादावर चर्चा करण्यासाठी नूपुर शर्मा यांनी एका स्थानिक न्यूज चॅनलवर हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी हिंदूंच्या श्रद्धेची कायमंच खिल्ली उडवली जात असल्याचे सांगितले. जर असंच करायचं असेल तर मी देखील दुस-या धर्माची खिल्ली उडवू शकते, असे विधान शर्मा यांनी केले होते. त्यांची ही व्हिडिओ क्लिप जुबेर नावाच्या एका व्यक्तीने ट्वीटवर वरुन शेअर केली. त्यानंतर नूपुर शर्मा यांना धमक्या येण्यास सुरुवात झाल्याचे सांगण्यात येत आहे.
(हेही वाचाः महाराष्ट्र भाजपचे मिशन 48, मविआला धोबीपछाड देण्याची व्यूहरचना)
Join Our WhatsApp Community