उन्हाळी सुट्टी निसर्गरम्य परिसरात घालवण्यासाठी सिक्कीमला गेलेल्या ठाण्यातील एकाच कुटुंबातील 5 जणांचा गाडी दरीत कोसळल्याने मृत्यू झाला आहे.
ठाण्यातील 18 जणांचा ग्रुपही होता
टेंभी नाक्यावरील ओशो महावीर या इमारतीमध्ये राहणारे सुरेश पुनमिया, तोरल पुनमिया, हिरल पुनमिया, देवांशी पुनमिया, जयंत परमार हे उन्हाळी सुट्टीसाठी सिक्कीम येथे गेले होते. त्यांच्यासोबत ठाण्यातील 18 जणांचा ग्रुपही होता. शनिवारी रात्री सर्वजण हाॅटेलमध्ये परतणार होते. कारने प्रवास करत असताना, नाॅर्थ सिक्कीमधील खेडुगजवळ रात्री नऊच्या सुमारास गाडी खोल दरीत कोसळली.
( हेही वाचा: दोन महिन्यांनी पुन्हा विजसंकट? )
शोधकार्य करताना अपघातग्रस्त कार आढळली
या भीषण अपघातात चालकासह ठाण्यातील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. एकूण तीन गाड्या हाॅटेलच्या दिशेने परतत होत्या, पण सुरेश पुनमिया यांची गाडी न आल्याने त्यांच्या सहका-यांनी मोबाईलवर संपर्क साधून शोध घेण्याचा प्रयत्न केला, पण कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. अखेर लष्कराला कळवण्यात आले आणि हेलिकाॅप्टरच्या सहाय्याने शोधकार्य करत असताना, अपघातग्रस्त कार आढळून आली.
Join Our WhatsApp Community