IRCTC Indian Railway: लांब पल्ल्यांच्या रेल्वे गाड्यांचे डबे लाल, निळे, हिरवेच का असतात? वाचा उत्तर

190

भारतीय रेल्वेने कोणी प्रवास केलाच नाही असे लोक फार क्वचित असतील. रेल्वेने प्रवास करताना प्रत्येकाच्या वेगवेगळ्या आठवणी असतील. मग त्या ठराविक एखाद्या रेल्वे गाडीशी असतील किंवा तिच्या रंग-रूपाशी संबंधित असतील. पण तुम्हाला माहिती आहे का..? या लांब पल्याच्या रेल्वे गाड्यांचे अर्थात एक्स्प्रेसच्या डब्यांचे रंग विशिष्ट का असतात? जसे की, लाल, निळा आणि हिरवा रंगच या डब्यांना का देण्यात येतो. प्रवास करताना तुम्हालाही कधी असा प्रश्न पडला असेल तर याचे उत्तर आज तुम्हाला मिळणार आहे. याबद्दल वाचा सविस्तर…

आशियातील दुसऱ्या क्रमांकाचे आणि जगातील चौथ्या क्रमाकंचे सर्वात मोठे रेल्वेचे जाळे भारतीय रेल्वेला मानले जाते. मिळालेल्या माहितीनुसार, भारतात एकूण ७ हजार ३४९ मालगाड्या आणि १२ हजार १६७ पेसेंजर ट्रेन्स असून याद्वारे दररोज २३ दशलक्ष प्रवास करतात.

लाल रंगाचे रेल्वे डबे

भारतीय रेल्वेमध्ये सध्या लाल रंगाच्या डब्यांची संख्या वाढली आहे. लाल रंगाच्या रेल्वे डब्यांना LBH म्हणजेच Linke HofMann Busch असे म्हणतात. हे रेल्वे डबे पंजाबमधील कपूरथला येथे तयार केले जात असून ते तयार करण्यासाठी स्टेनलेस स्टीलचा वापर केला जातो यामुळे ते वजनाने हलके असतात. हे डबे डिस्क ब्रेकसह २०० किमी ताशी वेगाने चालवता येतात. त्याच्या देखरेखीसाठी कमी खर्च येतो. विशेष म्हणजे त्यामध्ये सेंटर बफर कुलिंग सिस्टम असल्याने अपघातात जास्त नुकसान होत नसल्याची माहिती मिळतेय.

(हेही वाचा – तुम्ही UIDAI Aadhar Card ची झेरॉक्स कोणालाही देताय? तर सावधान, नाहीतर…)

हिरव्या रंगाचे रेल्वेचे डबे

हिरव्या रंगाचे डबे गरीब रथ एक्स्प्रेस गाड्यांना वापरले जातात. तर मीटर गेज गाड्यांमध्ये तपकिरी रंगाचे डबे वापरले जातात आणि नॅरोगेज गाड्यांमध्ये हलक्या रंगाचे डबे शक्यतो वापरले जातात. आता देशातील नॅरोगेज गाड्या सध्या जवळपास बंद झाल्याचे पाहायला मिळत आहे.

निळ्या रंगाचे रेल्वेचे डबे

निळ्या रंगाच्या डब्यांना इंटिग्रल कोच फॅक्टरी कोचेस म्हटले जाते. निळ्या डब्यांसह ट्रेनचा वेग हा ७० ते १४० किमी ताशी वेग इतका असतो. मेल एक्स्प्रेस किंवा सुपरफास्ट गाड्यांमध्ये हे डबे शक्यतो वापरले जातात. इंटिग्रल कोच फॅक्टरी तामिळनाडू येथे आहे. ते तयार करण्यासाठी लोखंडाचा वापर केला जातो. हे डबे वजनाने जड असतात. त्यामुळे त्यांच्या देखभालीचा खर्च जास्त असतो. या डब्यांना दर १८ महिन्यांना ओव्हरहॉल करणं गरजेचं असल्याचे सांगितले जात आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.