सर्वसामान्यांनी त्यांच्या आधारची झेराॅक्स कोणासोबतही शेअर करु नका, असा दिलेला सल्ला सरकारच्या युनिक आयडेंटिफिकेशन आॅथाॅरिटी ऑफ इंडियाने तत्काळ मागे घेतला आहे. इलेक्ट्राॅनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, या निर्णयाचा चुकीचा अर्थ लावला जाऊ शकतो. त्यामुळे आधारची झेराॅक्स कुणालाही शेअर करु नका, असा सल्ला देणारे निवेदन मागे घेण्यात आले आहे.
म्हणून निर्णय मागे घेण्यात आला
नागरिकांनी त्यांच्या आधारची प्रत कोणत्याही संस्थेसोबत शेअर करु नये, त्याचा गैरवापर होऊ शकतो, असे मंत्रालयाने म्हटले होते. यात आधार क्रमांकाचे शेवटचे चार अंक असणारे आधार कार्ड वापरले जाऊ शकते. यामध्ये आधार क्रमांकाचे पहिले आठ अंक लपवून ठेवले जातात, तर केवळ शेवटचे चार अंकच दिसतात. परंतु याचा चुकीचा अर्थ लावला जाण्याची भीती लक्षात घेऊन हा निर्णय तत्काळ मागे घेण्यात आल्याचे मंत्रालयाने म्हटले आहे.
( हेही वाचा: राज ठाकरेंना हिंदुत्वाकडून भाषिक मुद्दयाकडे वळवण्याचा डाव )
Join Our WhatsApp Community