मुंबई महानगर पालिकेकडून नवनीत राणा आणि रवी राणा यांनी त्यांच्या घरात अनाधिकृत बांधकाम केले असल्याचा आरोप करण्यात आला होता. यानंतर राणा दाम्पत्याकडून या प्रकरणी लेखी उत्तर मागविण्यात आले होते. मात्र नोटीस दिल्यानंतरही उत्तर न मिळाल्याने मुंबई महापालिका अर्थात बीएमसीचे पथक आज, सोमवारी खार येथील राणा दाम्पत्यांच्या घरी दाखल झाले आहे.
दरम्यान, राणांच्या घरासह संपूर्ण इमारतीचे ऑडिट करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. हे ऑडिट मुंबई महापालिकेच्या पथकाकडून केले जाणार आहे. अनधिकृत बांधकाम प्रकरणी हे ऑडिट होणार आहे. त्यापूर्वी बीएमसीच्या अधिकाऱ्यांनी घरात अनधिकृत बांधकाम झाल्याचं स्पष्ट केले होते. ते तात्काळ हटवावे नाहीतर मुंबई महापालिका ते हटवले असेही सांगितले जात आहे. यावेळी माध्यमांना नवनीत राणा यांनी असे सांगितले की, आम्ही कोणतेही बांधकाम केलेले नाही. तसेच विकासकाने बांधकाम केले आहे.
(हेही वाचा – नेपाळमधील बेपत्ता तारा एअरच्या विमानाचे अवशेष सापडले)
असेही सांगितले जात आहे की, नवनीत राणा यांच्यावर बीएमसीने मोठी कारवाई करण्याच्या तयारीत आहे. खार येथील राणा यांच्या इमारतीतील सर्व घरांच्या मालकांना बीएमसीकडून नोटीस बजावण्यात आली आहे. बीएमसीने सर्व घरांचे ऑडिट करणार आहेत. यापूर्वीही महापालिकेच्या टीमने राणांच्या खार येथील घराला भेट देऊन त्यांच्या फ्लॅटवर काही बेकायदेशीर बांधकाम आहे की नाही याची पाहणी केली होती.
Join Our WhatsApp Community