शेतकरी नेते राकेश टिकैत यांच्यावर शाईफेक, भर परिषदेत हाणामारी

137

कर्नाटकची राजधानी बेंगळुरूमध्ये शेतकरी नेते राकेश टिकैत यांच्यावर शाई फेकण्यात आली आहे. पत्रकार परिषदेदरम्यान हाणामारी झाल्यानंतर हा प्रकार घडला. यानंतर राकेश टिकैत यांच्या समर्थकांनी आरोपीला पकडून बेदम मारहाण केली. त्याचवेळी या घटनेनंतर कार्यक्रमात एकमेकांवर जोरदार खुर्च्या फेकण्यात आल्याचे व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे.

चंद्रशेखरांच्या समर्थकांवर आरोप

ही शाई स्थानिक शेतकरी नेते के चंद्रशेखर यांच्या समर्थकांनी फेकल्याचे सांगितले जात आहे. पत्रकार परिषदेदरम्यान टिकैत यांना पत्रकारांनी शेतकरी नेते चंद्रशेखर यांच्याबद्दल तुमचे काय म्हणणे आहे, असे विचारले असता उपस्थित लोकांनी सांगितले. त्यावर प्रतिक्रिया देताना टिकैत म्हणाले की, आमचा त्याच्याशी काहीही संबंध नाही. हे ऐकताच चंद्रशेखर यांचे समर्थक संतप्त झाले आणि त्यांनी टिकैत यांच्यावर शाई फेकली.

(हेही वाचा – आर्यन खानच्या सुटकेनंतर समीर वानखेडे म्हणाले; “मी नकारात्मक…”)

बघा व्हिडिओ

मला कोणतेही संरक्षण दिले गेले नाही

येथील स्थानिक पोलिसांकडून कोणतीही सुरक्षा पुरविण्यात आलेली नाही. हे सरकारच्या संगनमताने झाले असल्याचे राकेश टिकैत यांनी म्हटले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.