केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) सोमवारी नागरी सेवा परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर केला. परीक्षेला बसलेले उमेदवार UPSC च्या अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर त्यांचे निकाल पाहू शकतात. UPSC CSE प्रीलिम्स 10 ऑक्टोबर 2021 रोजी झाली होती. त्याचा निकाल 29 ऑक्टोबरला जाहीर झाला. मुख्य परीक्षा 7 ते 16 जानेवारी 2022 या कालावधीत घेण्यात आली आणि निकाल 17 मार्च 2022 रोजी घोषित करण्यात आला. यानंतर 5 एप्रिलपासून सुरू झालेल्या आणि 26 मे रोजी संपलेल्या मुलाखतींनंतर केंद्रीय लोकसेवा आयोगाचा अंतिम निकाल सोमवारी जाहीर झाला. यामध्ये पहिल्या तीन क्रमांकावर मुलींनी बाजी मारली आहे.
UPSC declares 2021 Civil Services Exam results
Shruti Sharma, Ankita Agarwal and Gamini Singla secure top three ranks, respectively pic.twitter.com/b0x9N0IomU
— ANI (@ANI) May 30, 2022
श्रुती शर्मा या परीक्षेत अव्वल
यूपीएससीच्या निकालात मुलींचा वरचष्मा दिसून आला असून पहिल्या क्रमांकावर श्रुती शर्मानंतर अंकिता अग्रवाल दुसऱ्या क्रमांक तर गामिनी सिंगला हिला तिसरा क्रमांक मिळाला आहे. चौथ्या क्रमांकावर ऐश्वर्या वर्मा होती. उत्कर्ष द्विवेदी याला पाचवा क्रमांक मिळाला आहे. यक्ष चौधरी सहाव्या क्रमांकावर राहिला. आठवा रँक इशिता राठी, नववा रँक प्रीतम कुमार आणि दहावा रँक हरकिरत सिंग रंधावाला मिळाला आहे.
टॉप 10 लिस्ट
- श्रुति शर्मा
- अंकिता अग्रवाल
- गामिनी सिंगला
- ऐश्वर्या वर्मा
- उत्कर्ष द्विवेदी
- यक्ष चौधरी
- सम्यक स जैन
- इशिता राठी
- प्रीतम कुमार
- हरकीरत सिंह रंधावा
यूपीएससीचा जो निकाल समोर आला आहे, त्यामध्ये महाराष्ट्रातून प्रियंका म्हाडदळकर ही पहिली आली आहे. तिची ऑल इंडिया रँक 13 वी आली आहे. टॉप 15 मध्ये राज्यातून हे एकच नाव असल्याचे सांगितले जात आहे.
- शुभांकर प्रत्यूष पाठक
- यशरथ शेखर
- प्रियंवदा अशोख म्हाडदळकर
- अभिनव जैन
- सी यशवंतकुमार रेड्डी
असा बघा यूपीएससीचा अंतिम निकाल
- सर्वप्रथम UPSC च्या अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर जाऊन भेट द्या.
- होमपेजवर गेल्यानंतर UPSC नागरी सेवा निकाल 2021 अशी अंतिम निकालाची लिंक दिसेल.
- येथे तुम्हाला निवडलेल्या उमेदवारांच्या नावांसह PDF फाइल दिसेल.
UPSC द्वारे नियुक्तीसाठी एकूण 685 उमेदवारांची शिफारस करण्यात आली आहे. यामध्ये 244 OPEN, 73 EWS, 203 OBC, 105 SC आणि 60 ST प्रवर्गातील उमेदवारांचा समावेश आहे. UPSC द्वारे नागरी सेवा परीक्षा दरवर्षी घेतल्या जातात. पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत अशा तीन टप्प्यांनंतर निकाल जाहीर केला जातो. जे निकालात यशस्वी होतात ते IAS, IFS इत्यादी अधिकारी होतात.