बोरीवली ते घाटकोपर या मार्गावर धावणारी ३८८ क्रमांकाची बससेवा प्रवाशांच्या सुविधेकरीता पूर्ववत सुरू करण्यासाठी वारंवार विनंती, पत्रव्यवहार करूनही प्रवाशांच्या सोयीचा विचार न करता बेस्ट प्रशासनाने प्रवाशांच्या अल्प प्रतिसादाचे कारण देत ही बससेवा पुन्हा सुरू करण्यास असमर्थता दर्शवल्यामुळे वॉर्ड क्रमांक ३५ मधील भाजप नगरसेविका सेजल प्रशांत देसाई यांनी बेस्ट उपक्रमाला पत्र लिहित बोरीवली ते घाटकोपर ३८८ क्रमांकाची बस पुन्हा पूर्ववत सुरू करून सकारात्मक कार्यवाही करावी अशी विनंती उपक्रमाला केली आहे.
( हेही वाचा : आता मोबाईल नेटवर्क नसतानाही करू शकता Call, फोनमधील ‘या’ सेटिंग्ज बदला)
प्रवाशांची गैरसोय
बोरीवली ते घाटकोपर या दरम्यान धावणारी ३८८ ही बस मध्यमवर्गीय प्रवाशांना सोयीस्कर व सवलतीच्या दरात बोरीवली, मुलुंड, घाटकोपर या मार्गावर सेवा देते. या मार्गावरील मेट्रो व खाजगी टॅक्सी सुविधेपेक्षा बेस्टची बससेवा प्रवाशांना वाजवी दरात मिळत होती. तसेच बोरीवली ते घाटकोपर प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना सुद्धा त्यांच्या इच्छितस्थळी पोहोचण्यासाठी मध्येच वाहन बदल करावा लागत नसल्याने ३८८ क्रमांकाची बस त्यांना सुरक्षित वाटत होती.
मध्यंतरी बेस्ट प्रशासनाने या मार्गावर ४८८ क्रमांकाची वातानुकुलित बससेवा सुरू केली होती परंतु या गाडीला अल्प प्रतिसाद मिळत कालांतराने प्रवाशांच्या अल्प प्रतिसादाचे कारण देत ही बससेवा सुद्धा बंद करण्यात आली. यामुळे या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांची गैरसोय झाली असून त्यांना घाटकोपर पर्यंतच्या प्रवासाकरीता मोठ्या प्रमाणात आर्थिक भूर्दंड सहन करावा लागत आहे. असे सेजल देसाई यांनी पत्रात नमूद केले आहे. या मार्गावरील बससेवा पूर्ववत सुरू करण्याची मागणी येथील बहुसंख्य राहिवासी प्रवासी मला वारंवार करीत असून निदान नमूद मार्गावर मिनी बससेवा सुरू करण्याची मागणी ज्येष्ठ नागरिकांसह अन्य प्रवाशांनी केली आहे असेही त्यांनी या पत्रात स्पष्ट केले आहे.
सकारात्मक कार्यवाही करावी अशी विनंती
सर्व प्रवाशांच्या सोयीचा विचार करता बोरीवली ते घाटकोपर पर्यंतच्या मार्गावरील ३८८ क्रमांकाची बससेवा प्रवाशांच्या सुविधेकरीता पूर्ववत सुरू करणेसाठी सकारात्मक कार्यवाही करावी अशी विनंती नगरसेविका सेजल देसाई यांनी बेस्ट उपक्रमाला पत्र लिहित केली आहे.
Join Our WhatsApp Community